आंदोलकांनी महामार्गावरून टायर बाजूला करून महामार्ग केला मोळका…
सरकारने दखल न घेतल्यास दोन दिवसांनी गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेण्याचा अंदोलकांचा इशारा..
नेवासा (प्रतिनिधी)- नेवासा फाटा येथे मागील आठ दिवसांपासून धनगर समाजाच्या सुरू उपोषणाची दखल न घेतल्याने बुधवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी अहमदनगर – संभाजीनगर महामार्गावर टायर जाळून सरकारचा निषेध केला. यावेळी महामार्गावर दुतर्फा वाहतूक खोळंबली होती. आंदोलकांनी महामार्गावरील टायर बाजूला करत महामार्गावर खुला केला.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा १८ सप्टेंबर पासून धनगर समाजाने सुरू केलेल्या आमरण उपोषणास ८ दिवस होवून ही न्याय मिळत नसल्याने कार्यकर्ते झाले आक्रमक झाले. बुधवारी दुपारी अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर समर्थकांनी टायर पेटवून नेवासा फाटा येथे महामार्ग अडवला. तर उपोषण स्थळी उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी महामार्गावर पेटवली टायर बाजूला करून वाहतूक महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला.अचानक महामार्गावर टायर पेटवून टाकल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपोषण स्थळी दाखल झाले.
सरकारने व स्थानिक प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने दि.२७ रोजी अहमदनगर – संभाजीनगर महामार्गावरील गोदावरी नदीत जलसमाधी घेणार असल्याचा इशारा धनगर समाजाचे नेते अशोकराव कोळेकर यांनी देवून सरकारचे लक्ष वेधले आहे.धनगर समाजाशिवाय सत्तेत कोणीही येऊ शकत नाही महाराष्ट्रात तीन ठिकाणी राज्यव्यापी उपोषण चालू आहेत. तरी राज्य सरकार दुर्लक्ष का करते? हा प्रश्न धनगर समाजाला पडला आहे असे ते म्हणाले.उपोषण कर्ते प्रल्हाद सोरमारे व रामराव कोल्हे या दोघांची प्रकृती खालवली असून वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व आमदार, खासदार यांना त्यांची जागा दाखवून देवू उपोषण स्थळी कुठलेही नेते मंडळी आले नाही आमच्या भावना सरकार पर्यत कशा पोहचणार त्यामुळे आता फक्त जलसमाधी हाच एक पर्याय असल्याचे उपोषण कर्ते प्रल्हाद सोरमारे यांनी सांगितले.