श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या २६ जागांवर आज बुधवार २५ सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. या टप्प्यात २३९ उमेदवार रिंगणात आहेत. साधारण २.५ लाख मतदार आज घराच्या बाहेर निघत मतदान करतील आणि सर्व उमेदवारांच्या नशिबाचा फैसला करतील.
२०१४ पासून आतापर्यंत १० वर्षांच्या दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. आधी पहिल्या टप्प्यातील मतदान १८ सप्टेंबरला २४ जागांवर झाले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ जागांवर होत आहे. मतदानादरम्यान प्रत्येक पोलिंग बूथवर सुरक्षा व्यवस्था कडक असेल.
मिळालेल्या माहितीनुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने २६ क्षेत्रांमध्ये ३५०२ मतदान केंद्र उभारली आहेत. यामुळे मतदार आरामात कोणत्याही त्रासाशिवाय मताधिकाराचा वापर करतील.
जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाअंतर्गत श्रीनगर जिल्ह्यातील ९३ उमेदवार मैदानात आहेत. तर बडगाममध्ये ४६ उमेदवार, राजौरी जिल्ह्यात ३४, पूंछ जिल्ह्यात २५, गांदेरबलमध्ये २१ आणि सियासीमध्ये २० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…
भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…
अॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…
राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…