Tirupati Laddu : जनावराच्या चरबीनंतर आता तंबाखू? तिरुपती बालाजीच्या प्रसादाबाबत अजून एक VIDEO व्हायरल

  210

खम्माम : आंध्र प्रदेशयेथील तिरुपती मधील श्री वेंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटप केल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये जनावरांच्या चरबीचा आणि निकृष्ट दर्जाच्या तूपाचा वापर केला जात होता, असं म्हणत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री नारा चंद्राबाबू नायडू यांनी आंध्रचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्यावर खूप गंभीर आरोप केला आहे. चंद्राबाबू नायडूंच्या या आरोपांनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पाठोपाठ लाडवांच्या नमुन्यामध्ये निम्न दर्जाचे तूप आणि प्राण्यांची चरबी आढळल्याचं तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) शुक्रवारी सांगितले. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतायत. तिरुमला तिरुपती देवस्थान (Tirupati Balaji) हे जगभरात प्रसिद्ध आहे. अशातच या ठिकाणी असलेले प्रसादाचे लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात. दरम्यान, या लाडवांमध्ये आता तंबाखू आढळल्याचा दावा एका भाविकाने केला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा येथील खम्माम जिल्ह्यातील रहिवासी दोंतू पद्मावती यांनी दावा हा केला आहे की तिरुपती मंदिरातून प्रसाद म्हणून मिळालेल्या लाडवांमध्ये त्यांना तंबाखूची पुडी आढळली आहे. या महिलेने म्हटलं आहे की तिने प्रसादात मिळालेले लाडू घरी नेले होते. मात्र, तंबाखूची कागदाची पुडी त्या लाडवांमध्ये आढळली आहे. याचा व्हिडीओ देखील समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. (आम्ही या व्हिडीओची पुष्टी केलेली नाहीये.)




पद्मावती काय म्हणाल्या ?


दोंतू पद्मावती या खम्माम जिल्ह्यातील कार्तिकेय परिसरात राहणाऱ्या १९ सप्टेंबर रोजी तिरुमाला मंदिरात गेल्या होत्या. प्रत्येक भक्ताप्रमाणे तिथे जाणाऱ्या पद्मावती यांना देखील तिथे प्रसाद मिळाला होता. तो प्रसाद त्यांनी घरी नेला आणि कुटुंबातील सदस्यांसोबतच नातेवाईक व शेजाऱ्यांना वाटला. पद्मावती म्हणाल्या, “आम्ही लाडूचं पाकीट उघडलं, लोकांमध्ये वाटण्यासाठी लाडूचे तुकडे केले. त्यावेळी कागदाच्या पुडीत बांधलेली तंबाखू आम्हाला त्यामध्ये आढळली. लाडवामध्ये तंबाखू असल्याचं पाहून आम्हा सर्वांना धक्का बसला. हा प्रसाद पवित्र असेल असं आम्हाला वाटलेलं, मात्र प्रसादात तंबाखू असल्याचं बघून आम्हा सर्वांनाच खूप वाईट वाटलं”. दरम्यान पद्मावती यांनी केलेल्या या दाव्याने सर्वानाच धक्का बसला आहे.




चंद्राबाबू नायडूंचा नेमका आरोप काय?


चंद्राबाबू नायडू म्हणाले, गेल्या पाच वर्षांमध्ये जेव्हा वायएसआर काँग्रेस पक्ष सत्तेत होता तेव्हा त्यांनी पवित्र मानल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानचं (Tirupati Balaji) पावित्र्य घालवून टाकलं. मंदिरातर्फे जे अन्नदान केलं जातं अर्थात‘अन्नदानम’ त्याच्या दर्जाची पातळीही काँग्रेसच्या काळात खालावलेली होती. तिरुमला तिरुपती देवस्थान येथील लाडू हे पवित्र प्रसाद म्हणून मानले जातात. या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला. सरकार आमचं आल्यापासून आम्ही शुद्ध तुपातील लाडू तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मंदिरातील अन्नदानात दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही आम्ही खूप सुधारला आहे.



Comments
Add Comment

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत

पंतप्रधान मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या संदर्भात परराष्ट्र सचिव

उदयगिरी आणि हिमगिरी, २ निलगिरी-क्लास फ्रिगेट्स भारतीय नौदलात दाखल

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात नौदलाने मंगळवारी आयएनएस

भिंतीवरून उडी मारून पलायन करणारा आमदार ईडीच्या ताब्यात

फोन नाल्यात फेकला कोलकाता : पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीतील कथित

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)