Navra Maza Navsacha 2 : बॉक्स ऑफिसवर 'नवरा माझा नवसाचा २' ची ट्रेन सुसाट!

मुंबई : मराठी सिनेसृष्टीमधील (Marathi Movie) दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या नवरा माझा नवसाचा २ (Navra Maza Navsacha 2) या चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. "नवरा माझा नवसाचा २" चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग्जपैकी आहे. १००० पेक्षा अधिक शोज ने सुरुवात केलेल्या या चित्रपटाला ६०० पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल होते. वीकेंडला ७. ८४ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे.


सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवादलेखन संतोष पवार यांचं आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar), अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar), महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे यांच्यासह मोठी स्टारकास्ट आहे. नवस फेडण्यासाठी जातानाचा रेल्वे प्रवास, त्यात होणाऱ्या गमतीजमती हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत असून प्रेक्षकांना हे सरप्राइज पसंतीस पडले आहे.


बऱ्याच दिवसांपासून रसिक प्रेक्षकांमध्ये "नवरा माझा नवसाचा २" हा चित्रपट चर्चेत राहिला आणि त्याचंच प्रतिबिंब बॉक्स ऑफिसवरही (Box Office Collection) उमटत आहे. चित्रपटावरचं प्रेम प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिसादातून दाखवून दिलं आहे. आता येत्या काही दिवसांत हा प्रतिसाद आणखी वाढेल यात शंका नाही.

Comments
Add Comment

शॉर्टमध्ये सांगितलेली बेकेट थिअरी

भालचंद्र कुबल, पाचवा वेद हल्ली अँटीसिपेटेड कथानकांचा एवढा कंटाळा आलाय ना की समजा नाटक बघताना तुमच्या बाजूच्या

तरुण तुर्क : तोरडमल ते तोडणकर...

राज चिंचणकर, राजरंग ज्येष्ठ नाटककार व रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल यांनी त्यांच्या नाटकांतून भूमिकाही रंगवल्या

'हि-मॅन'ला शेवटचे पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता; नवीन वर्षाची सुरुवातच होणार देशभक्तीने

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. मात्र बॉलिवूडचा हि-मॅन कायमच आपल्या

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला

देवदास ते दिल तो पागल है - २०२५ मध्ये पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट

क्लासिक ते कल्ट : २०२५ मध्ये सिनेमागृहांत पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट नॉस्टॅल्जिया हा मोठा सिनेमॅटिक

'आयुष्यभराचा सॅंटा' म्हणत मराठी अभिनेत्रीने करून दिली होणाऱ्या नवऱ्याची ओळख

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या