अनेक कलाकारांनी अभिनय क्षेत्र सांभाळून गेल्या काही दिवसांत आपल्या वैयक्तिक आयुष्यात नवनवीन व्यवसाय सुरू केल्याचं पाहायला मिळालंय. हार्दिक जोशी, सई ताम्हणकर, महेश मांजरेकर, अनघा अतुल, प्रसाद लिमये, अक्षया देवधर यांसारख्या अनेक कलाकारांनी गेल्या काही वर्षांत हॉटेल, कपड्यांचे, दागिन्यांचे व्यवसाय सुरू केल्याचं आपण पाहिलंय. आता अशातच या यादीत आता छोट्या पडद्याच्या लाडक्या सूनबाईचं नाव सामील झालं आहे.
‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमधून अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) सर्वांच्या घराघरांत लोकप्रिय झाली. मालिकेमध्ये रेश्मा आदर्श सूनेची भूमिका साकारत आहे. रेश्माचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने रेश्मा नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आता सध्या ती एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. ती गोष्ट म्हणजे अशी की, रेश्माने आता व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. छोट्या पडद्यावरची लाडकी सून आता उद्योजिका झाली आहे. यासंदर्भात रेश्माने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांना माहिती दिली आहे. याशिवाय तिने तिच्या नव्या व्यवसायाची झलक देखील सर्वांना दाखवली आहे.
रेश्मा शिंदेने पुण्यात कोथरुडमध्ये पालमोनास या ज्वेलरी ब्रँडबरोबर भागीदारी करत स्वत:चं ज्वेलरी शॉप उघडलं आहे. याबाबतची पोस्ट शेअर करून तिने माहिती दिली आहे. रेश्माने तिच्या ज्वेलरी शॉपच्या ओपनिंगला पांढर्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान करून वेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळालं.
अभिनेत्री रेश्मा शिंदे लिहिते, “अभिनयाच्या प्रवासात तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम केलंत. आता एक नवीन प्रवास तुमच्या साक्षीने सुरू करते आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्या पाठिशी असू दे. उद्योजिका म्हणून नवीन प्रवास सुरू करताना मला अतिशय आनंद होत आहे. मी पालमोनास या ब्रँडबरोबर पार्टनरशिप करून हा व्यवसाय सुरू केला आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचं खूप खूप आभार”
दरम्यान, नेटकऱ्यांनी रेश्माच्या ( Reshma Shinde ) पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. श्रेया बुगडे, अभिज्ञा भावे, शिवानी बावकर, अनघा अतुल, ऋजुता देशमुख, शिवानी सोनार, अश्विनी कासार, अपूर्वा नेमळेकर, यांनी पोस्टवर कमेंट्स करत अभिनेत्रीला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…