Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीSiddhivinayak Prasad : भाविकांच्या जीवाशी खेळ! सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदराची पिल्लं

Siddhivinayak Prasad : भाविकांच्या जीवाशी खेळ! सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदराची पिल्लं

व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

मुंबई : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी तसेच फिश ऑईल मिसळल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाला वाद फुटत असताना अशीच घटना पुन्हा घडल्याचे समोर आले आहे. मुंबइतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या (Siddhivinayak Temple) प्रसादात (Laddu Prasad) उंदरांनी थैमान घातला असल्याची माहिती मिळाली आहे.

सिद्धीविनायक मंदिरात प्रसाद ठेवलेल्या ट्रेमध्ये उंदराने पिल्लांना जन्म दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडीओमध्ये उदरांनी चक्क प्रसादाची पाकिटे कुरतडून लाडू खाल्ल्याचेही दिसून येत आहे. या प्रकारामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून भाविकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

स्वच्छतेचा प्रश्न उकिरड्यावर

समोर आलेल्या व्हिडीओनुसार, सिद्धीविनायक प्रसादाच्या पाकिटांवर उंदराची पिल्लं दिसत आहेत. लाडूच्या प्रसादाच्या टोपलीतच उंदराने पिल्लं दिली आहेत. त्यामुळे नागरिकांकडून सिद्धिविनायक मंदिरांच्या स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अध्यक्षांनी आरोप फेटाळले

दरम्यान, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. मंदिर परिसरात नेहमी स्वच्छता असते. समोर आलेला व्हिडीओ मंदिर परिसरातील नसून यामागे कोणाचं तरी षडयंत्र असल्याचं सरवणकर म्हणाले. तसेच कोणीतरी प्लॅस्टिकमध्ये उंदीर घालून ते प्रसादात ठेवले आणि त्याचा व्हिडीओ काढला असावा, असेही सरवणकर म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -