मुंबई : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ (Mazi Ladki Bahin Yojana) राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. मागील महिन्यात १५ ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडक्या बहीण योजनेचे दोन हफ्ते जमा झाले होते. त्यानंतर या योजनेला महिलावर्गाकडून मिळणार प्रतिसाद आणखी प्रमाणात वाढला होता. त्यानंतर तिसरा हफ्ता कधी जमा होणार असा प्रश्न महिलांना सातत्याने पडत होता. आता या प्रश्नाला पूर्णविराम मिळणार असून तिसरा हफ्ता (3rd Installment) मिळण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम रायगडमध्ये होत आहे. २९ सप्टेंबर रोजी तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होत आहे. त्याचदिवशी म्हणजे २९ सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यात तिसरा हफ्ता जमा होणार आहे. सप्टेंबरपर्यंत आलेल अर्ज यांचे लाभ वितरित करण्यात येतील. या योजनेमुळे २ कोटी महिलांना लाभ दिले जाणार आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
अर्ज करण्याचा शेवटचा दिवस
३० सप्टेंबरपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महिलांचा अर्ज स्वीकार झाल्यानंतर त्यानंतर तीन महिन्यांचे एकत्रित असे ४५०० खात्यात जमा होणार आहेत.