Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीCrime : मालाड येथील अल्पवयीन मुलीवर नालासोपार्‍यात सामूहिक बलात्कार

Crime : मालाड येथील अल्पवयीन मुलीवर नालासोपार्‍यात सामूहिक बलात्कार

एका महिन्यात नालासोपार्‍यात तब्बल सहा बलात्काराच्या घटना!

नालासोपारा : सोशल मीडियामध्ये मैत्रीच्या नावाखाली ओळख निर्माण करुन महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहून महिला, मुलींच्या मनात पुन्हा असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

मुंबईतल्या मालाड येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियामध्ये मैत्री करून या मुलीला नालासोपा-यात बोलवून या मुलीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सामूहिक बलात्काराची नालासोपार्‍यातील एका महिन्यातील ही सहावी घटना आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १६ वर्षांची असून मुंबईत मालाड येथे राहते. तिची नालासोपार्‍यात राहणार्‍या अनिस शेख (२३) या तरुणाबरोबर सोशल मीडियावर ओळख झाली. त्याने २ सप्टेंबर रोजी तिला नालासोपा़र्‍यात बोलावून जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा त्याने संधी साधत या मुलीवर बलात्कार केला. तसेच याची कोठेही वाच्यता करु नकोस असे बजावून सांगितले.

सदर पीडित मुलगी गप्प राहिल्याचे दिसून येताच त्याने ५ सप्टेंबर रोजी तिला पुन्हा नालासोपारा येथे बोलावले होते. त्यानंतर सनसाईन उद्यानात आरोपी अनिस शेख आणि त्याचा मित्र जियान या दोघांनी तिच्याशी लगट केली. त्यानंतर तिला दुचाकीवर बसवून अर्नाळा येथील एका लॉजमध्ये नेले. तेथेच अनिस शेख याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला.

यावेळी झियान याने त्या संबंधाचे आपल्या मोबाईल मध्ये चित्रण केले आणि हा प्रकार कुणाला न सांगण्याची धमकी देत मारहाण देखील केली.

परंतु पीडित मुलीने धीर गोळा करत अखेर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु पहिला गुन्हा आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने तो आचोळे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

आचोळे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६५(१), ७४, १३७(२), ११५(२), ३५१(२) ३(५) तसेच पोक्सोच्या कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी आम्ही अनिस शेख या आरोपीला अटक केली आहे. अन्य फरार आरोपीचा शोध सुरू आहे. अशी माहिती आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली.

महिनाभरात नालासोपार्‍यातील सामूहिक बलात्काराच्या घटना

  • ३ सप्टेंबर २०२४ – कामाच्या शोधासाठी आलेल्या महिलेवर नालासोपार्‍याच्या धानिव बाग येथे दोघांचा सामूहिक बलात्कार
  • ९ सप्टेंबर २०२४ – गणेश आगमन सोहळा पाहण्यासाठी गेलेल्या १४ वर्षांच्या मुलीवर दोन इसमांकडून शिर्डीनगर येथे सामूहिक बलात्कार
  • १० सप्टेंबर २०२४ – नालासोपारा परिसरातील संतोष भवन येथे एका ३२ वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आला. महिलेच्या वक्तव्याच्या आधारे, तुलिंज पोलिसांनी दोन आरोपी जितेंद्र यादव आणि अवी जैस्वाल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७०(१) आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
  • २१ सप्टेंबर २०२४ – नालासोपारा येथे राहणार्‍या २२ वर्षीय तरुणीवर नवीन सिंग आणि संजीव श्रीवास्तव या दोघांनी तिला गुंगीकार औषध टाकून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी तिचा हेमा सिंग हिने अश्लील चित्रफित तयार केली. त्या आधारे ननवीन सिंग तिच्यावर सतत बलात्कार करत होता. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार करण्यात आला.
  • २२ ऑगस्ट २०२४ – नालासोपारा येथील धानिव बाग परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी सामूहिक बलात्कार.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -