बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एनकाऊंटरमध्ये मृत्यू

  155

मुंबई: बदलापूरमधील एका शाळेत अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषणातील आरोपी अक्षय शिंदे पोलीस एनकाऊंटरमध्ये मारला गेला आहे. समोआलेल्या माहितीनुसार आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांच्या गाडीमध्ये पोलिसांच्या रिव्हॉल्वर खेचून पोलीस टीमवर गोळीबार केला होता. आरोपीने पोलिसांच्या टीमवर राऊंड फायरिंग केली होती. यात एक पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. ही घटना तेव्हा घडली जेव्हा पोलिसांच्या टीमने अक्षयला तळोजा तुरूंगात आणले जात होते.



पोलिसांची काय आहे माहिती?


पोलिसांनी सांगितले की आरोपीने पोलिसांच्या टीमवर फायरिंग केल्यानंतर आरोपीवरही प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला होता. यात अक्षयला गोळी लागली होती. जखमी होताच त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.



दोन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणातील आरोपी


ठाण्यातील बदलापूर येथे १२ आणि १३ ऑगस्टला एका शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदेवर दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. पीडित मुलींनी जेव्हा आई-वडिलांना याबाबत सांगितले. त्यानंतर ही घटना समोर आली होती. यानंतर बदलापूरमध्ये जोरदार हंगामा झाला होता.

Comments
Add Comment

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

विधवा पेन्शन योजनेची रक्कम ५००० रुपये करा

खासदार रविंद्र वायकर यांनी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे व सचिव यांना पाठवले पत्र मुंबई : राज्यातील

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक