नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी आम आदमी पक्षाने आतिशी मार्लेना यांची अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर एकमुखाने निवड केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्रीपदाचा पदभार आतिशी यांनी स्वीकारला. दरम्यान, आतिशी यांच्या बाजुला पदभार स्वीकारताना एक रिकामी खुर्ची ठेवण्यात आली. त्यामुळे त्यांच्या या कृतीची आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी माध्यमांशी बोलताना यामागचं कारणही सांगितलं आहे.
आतिशी मार्लेना यासंदर्भात मीडियाशी बोलताना म्हणाल्या, ज्याच्याप्रमाणे महाभारतात भरत यांनी प्रभू श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेऊन १४ वर्ष राज्य केलं, त्याचप्रमाणे मीसुद्धा पुढचे चार-पाच महिने सरकार चालवणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या सन्मानार्थ मी हा निर्णय घेतला आहे. पुढे बोलताना म्हणाल्या आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पुन्हा विजय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मी केवळ आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री असणार आहे. दिल्लीतील जनता या निवडणुकीत पुन्हा आम आदमी पक्षाला बहुमताने निवडून देईल आणि अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, भाजपाने आम आदमी पक्षावर आतिशी यांच्या या निर्णयानंतर जोरदार टीका केलीये. यावरून दिल्लीचे सरकार आतिशी नाही, तर आता अरविंद केजरीवाल रिमोट कंट्रोलद्वारे चालवणार, हे सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री पदाचा हा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया दिल्ली भाजपाच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…