अमरावती : खरीपात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पेरल्या जाणाऱ्या सोयाबीनवर आता पुन्हा एकदा पिवळ्या मोझॅकसह विषाणूजन्य मोझॅकचा प्रादुर्भाव दिसून आलाय. जिल्ह्यांत या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याने सोयाबीन उत्पन्नात जवळपास ७५ टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलं. अमरावती जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यात सध्या सोयाबीनवर पिवळ्या मोझॅक चा प्रादुर्भाव आहे.
मागील वर्षी सोयाबीन शेतकऱ्यांना पावसाच्या तऱ्हेमुळे मोठं नुकसान झालं होतं. सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि नंतर अतिवृष्टीमुळे सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पिकाने माना टाकल्याचे चित्र होते. परिणामी, अजूनही शेतकऱ्यांना सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. आता पुन्हा हा रोग पिकावर पसरला तर यंदाही सोयाबीन धोक्यात येण्याची शक्यता आहे.
पहिल्या पेऱ्यातील सोयाबीनची काढणी ही सुरु आहे तर उशीराने पेरा झालेले सोयाबीन अजूनही शेतातच आहे. खरीप घाईंन आणि रब्बीची पेर दमानं.. अस आजही ग्रामीण भागात म्हटलं जातं..हे कशामुळे ते उशीराने पेरणी करणाऱ्यां शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. उशीराने पेरणी झालेले सोयाबीन अजूनही वावरातच आहे तर पहिल्या पेऱ्यातील सोयाबीन हे बाजारात. त्यामुळे मध्यंतरी झालेल्या पावसाचा परिणाम हा या सोयाबीनवर तर झालेलाच आहेच शिवाय आता ‘यलो मोझॅक’ चा प्रादुर्भाव यावर दिसून येत आहे.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…