१३१२ विकेट आणि १० हजाराहून अधिक धावा, ही आहे भारताची सर्वात घातक जोडी

मुंबई: रवीचंद्रन अश्विन, ज्याला पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर मॅन ऑफ द मॅच निवडण्यात आले. अश्विनने पहिल्या सामन्यात एक शतक ठोकले आणि दुसऱ्या डावात ६ विकेटही घेतल्या. दुसरीकडे रवींद्र जडेजाने पहिल्या डावात ८६ धावा खेळण्यासोबतत एकूण सामन्यात ५ विकेटही घेतल्या. हे दोनही खेळाडू गेल्या एका दशकापासून अधिक वेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाची मोठी ताकद बनले आहेत.



एकत्र घेतल्यात १३१२ विकेट


अश्विनबद्दल बोलायचे झाल्यास २०१०मध्ये भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने तीनही फॉरमॅटमधून एकूण २८१ सामने खेळले आहेत. यात त्याने ७४४ विकेट घेतले आहेत. सोबतच अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. घरच्या मैदानावरील क्रिकेटमध्ये भरपूर शतके ठोकण्याशिवाय विकेट काढणाऱ्या अश्विनने भारतासाठीही चांगली कामगिरी केली आहे.


जडेजाने ३४३ सामन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकूण ५६८ विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच अश्विन आणि जडेजा यांनी मिळून १३१२ विकेट घेतल्या आहेत.



अश्विन-जडेजाची जोडी फलंदाजीतही टॉप क्लास


अश्विन-जडेजाची जोडी गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही भारताची ताकद बनली आहे. अश्विनने आपल्या कसोटी करिअरच्या तिसऱ्या डावातट वेस्ट इंडिजविरुद्ध १०३ धावांची खेळी करत सर्वांना स्तब्ध केले होते. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ शतके आणि १५ अर्धशतके ठोकत ४३१३ धावा केल्या आहेत. जडेजा सध्या कसोटी रेकॉर्डमध्ये अश्विनच्या मागे आहे. मात्र एकूण मिळून त्यांच्या नावावर तीनही फॉरमॅटमध्ये ६३९३ धावा आहेत. अश्विन आणि जडेजाच्या जोडीने बॅटिंगमधून मिळून १०,७०६ धावा केल्या आहेत.

Comments
Add Comment

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या