Sharad Pawar : निवडणूक चिन्हासाठी पवारांची कोर्टात धाव!

सर्वोच्च न्यायालयात २५ सप्टेंबर रोजी सुनावणी


नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Congress) उभी फूट झाल्यानंतर अजित पवारांकडे (Ajit Pawar) गेलेल्या घड्याळ निवडणूक चिन्हात अजूनही शरद पवार (Sharad Pawar) गटाचे मन गुंतले आहे. त्यामुळे दोन्ही गटांना तुतारी आणि घड्याळ चिन्हांऐवजी नवी चिन्हे द्यावीत या मागणीसाठी पवारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


शरद पवारांची याचिका तातडीने सुनावणी होण्यासाठी सूचिबद्ध करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्या. सूर्य कांत व न्या. उज्ज्वल भूयान यांच्या खंडपीठाकडे केली होती. त्यानुसार ही याचिका २५ सप्टेंबरला सुनावणीसाठी सूचिबद्ध करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या ६ फेब्रुवारीच्या निर्णयाला शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना नवीन निवडणूक चिन्हे देण्यात यावीत, अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली.


लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला दिलेले घड्याळ हे चिन्हवापरण्यास बंदी करावी, अशी याचिका शरद पवारगटाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर १९ मार्च रोजी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले तसेच 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार' हे नाव वापरण्याची परवानगी दिली होती. अजित पवार गटाने शरद पवार यांचे नाव आणि छायाचित्रे वापरू नये, असाही आदेश न्यायालयाने दिला होता.

Comments
Add Comment

भारताने युद्धासारख्या परिस्थितीसाठी सज्ज राहावे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर भारताने युद्धासारख्या

भारतातील तरुणांच्या लोकसंख्येत झपाट्याने घट

नवी दिल्ली : देशाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा अहवाल

Uttar Pradesh Crime : अक्षरशः क्रूरतेचा कळस, १२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापून गळा चिरला अन् नंतर...थरकाप उडवणारी हत्या

झांसी : उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि क्रूर हत्येची घटना समोर आली आहे. बबीना पोलीस

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार

नवी दिल्ली : भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली

तीव्र प्रकाशात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक

नवी दिल्ली : रात्री झोपताना खोलीत असणारा तेजस्वी प्रकाश केवळ झोपेवरच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर

अमेरिकेत कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विमान उड्डाणांवर परिणाम

वॉशिंग्टन : अमेरिकेत सुरू असलेल्या शटडाऊनचा व्यापक परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील