Adulterated Food : गणेशोत्सवात भेसळयुक्त पदार्थांचा थाटला धंदा; १४ लाखांचे खाद्यपदार्थ जप्त!

पुणे : उत्सव काळादरम्यान मिठाई, फरसाण, दूध आणि दुग्धजन्य उत्पादने जसे की तूप, खवा आणि पनीर यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढलेल्या मागणीमुळे काही वेळा काही उत्पादक या वस्तूंमध्ये भेसळ (Adulterated Food) करतात. यामुळे ग्राहकांचे आरोग्य लक्षात घेता, एफडीएने (NFD) पथके तयार केली होती.


गणेशोत्सवात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शहर, तसेच जिल्ह्यात कारवाई करून १४ लाख ३५ हजार रुपयांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त केले. त्यामुळे सण-वार आले की भेसळीचा धंदा चांगलाच जोरात चालतो, हे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.


एफडीएच्या पथकाने पुणे शहर, तसेच जिल्ह्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत भेसळयुक्त तूप, बटर, पनीर, खवा, मिठाई असे खाद्यपदार्थ जप्त केले. पुणे जिल्ह्यात करण्यात आलेल्या कारवाईत पाच लाख १६ हजार रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले, तसेच शहर परिसरातून नऊ लाख १९ हजार रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले, अशी माहिती सहआयुक्त सु. ग. अन्नपुरे यांनी दिली.


पुणे विभागात भेसळीच्या संशयावरून १०१ विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थांचे नमुने ताब्यात घेण्यात आले. एफडीएने ११७ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेेतले असून, विश्लेषणानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री होत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Pune: लेकीची छेड काढणाऱ्याला वडिलांनी दिला चोप; पुण्यातील नामांकित कॉलेजमधील संतापजनक घटना

पुणे: पुण्यातील नामांकित एमआयटी एडीटी (MIT ADT) कॉलेज परिसरात एक संतापजनक घटना घडली. इथं एका विद्यार्थिनीच्या

मुंबई उपनगरातील बांग्लादेशींवर नजर ठेवण्यासाठी विधानसभा निहाय समित्या गठित; मंगलप्रभात लोढा यांनी दिली माहिती

मुंबई: मुंबईतील वाढत्या बांग्लादेशींना हुडकून काढून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी विशेष

Pune: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; फडणवीसांकडून मोठी भेट, २५०० रोजगार निर्माण होणार

पुणे: पुणे आणि रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित

Palghar: पालघरच्या ५० हजार विद्यार्थ्यांना जपानमध्ये नोकरी मिळणार

पालघर: भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध केवळ औद्योगिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता आता ते शैक्षणिक

अरबी समुद्रात वाऱ्यांनी बदलली दिशा, मार्च हीटचा चटका, पावसाबाबत काय अंदाज?

मुंबई: मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हवामानाने कूस बदलली आहे. उत्तर भारतात

मुख्यमंत्री फडणवीसांंचा निर्णय; धडाकेबाज IAS अधिकाऱ्याची नागपूरमधून बदली

नागपूर: नागपूर महापालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी यांची बदली करण्यात आली आहे. अभिजीत चौधरी यांच्यावर पुणे महानगर