India vs Bangladesh: बांगलादेशविरुद्ध कसोटीत जसप्रीत बुमराहने रचला इतिहास

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदम्बरम क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू आहे. या कसोटी सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे.


भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या संघाला १४९ धावांवर रोखत आपल्या संघाला २२७ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात ४ विकेट घेत त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४०० विकेट पूर्ण केल्या.. बुमराहने कमी डावांमध्ये ४०० विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. बुमराहने केवळ २२७ डावांमध्ये ४०० विकेट मिळवल्या.


एकूण मिळून बुमराह सहावा वेगवान गोलंदाज आहे ज्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी ४०० विकेट मिळवल्या आहेत. याआधी ५ भारतीय वेगवान गोलंदाजांनी ४००चा आकडा पार केला आहे.


यात कपिल देव ६८७ विकेट(४४८ डाव), झहीर खान ५९७(३७३ डाव), जवागल श्रीनाथ ५५१ (३४८ डाव), मोहम्मद शमी ४४८ विकेट(२४५ डाव), इशांत शर्मा ४३४ विकेट(२८० डाव) यांचा समावेश आहे.


बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात बुमराहने शादमान इस्लाम(२), मुशफिकुर रहीम(८), हसन महमूद(९) आणि तस्कीन अहमद(११) यांना बाद केले.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहच्या नावावर ४०१ विकेट आहेत. बुमराहने ८९ वनडेमध्ये १४९ विकेट, ७० टी-२०मध्ये ८९ विकेट, तर ३६ कसोटीत १६३ विकेट घेतल्या आहेत.

Comments
Add Comment

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

मुंबई : १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही.

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे

पहिल्याच दिवशी मेलबर्नमध्ये ७५ षटकांत २० बळी

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडी नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस

भारतीय महिलांचा श्रीलंकेवर एकतर्फी मालिका विजय

शफाली वर्माची ७९ धावांची वादळी खेळी नवी दिल्ली : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा सामना ८ विकेट्सने

श्रीलंकेविरूद्धच्या खेळीत शेफाली अव्वल! भारतीय महिला क्रिकेट 'टी 20'च्या इतिहासात ठरली वेगवान अर्धशतक करणारी तिसरी फलंदाज

तिरुवनंतपुरम: भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर टी 20 मध्येही उत्कृष्ट कामगिरी कायम

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा