मुंबई: टेक्नॉलॉजीमधील दिग्गज कंपनी अॅपलच्या iPhone 16 सीरिजची विक्री आजपासून भारतात सुरू झाली आहे. कंपनीने ९ सप्टेंबरला आपल्या वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट इट्स ग्लोटाईममध्ये एआय फीचर्स सोबत iPhone 16 सीरिज लाँच केली होती. मुंबईच्या बीकेसी स्थित स्टोरमध्ये सेल सुरू होण्याआधी आयफोन शौकीनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या.
Apple स्टोर सुरू होण्याआधीच सकाळ-सकाळी लोक दुकानाच्या बाहेर रांगा लावण्यासाठी धावताना दिसले. अशा प्रकारची क्रेझ याआधीही iPhone 15 सीरिज जेव्हा लाँच झाली होते तेव्हा पाहायला मिळाले होते.
VIDEO | Huge crowd gathers outside an Apple store in Mumbai as the new iPhone 16 series goes on sale from today.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/rA61tyivaY
— Press Trust of India (@PTI_News) September 20, 2024
चार फोन्स झाले लाँच
कंपनीने iPhone 16 सीरिजमध्ये चार फोन्स लाँच केले आहेत. यात तुम्हाला डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत सर्वच बाबतीत बरंच काही नवं पाहायला मिळेल. दरम्यान एक काम Apple त्यांच्या संपूर्ण इतिहासात पहिल्यांदा केले आहे. ही पहिलीच वेळ आहे की कंपनीने नवे आयफोन जुन्यापेक्षा कमी किंमतीत लाँच केले आहे. खासकरून हे भारतात घडले आहे.
iPhone 16 आणि iPhone 16 plus ची किंमत
iPhone 16 आणि iPhone 16 plus ला पाच विविध रंगांमध्ये सादर केले आहे. यात Ultramarine, Teal, Pink, White आणि काळा रंग आहे. यात 128GB, 256GB आणि 512GB पर्याय मिळतात. iPhone 16ची सुरूवातचा किंमत ७९,९०० रूपये आणि iPhone 16 plus ची सुरूवातीची किंमत ८९,९०० रूपये आहे.