EK Daav Bhutacha : माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्ट "एक डाव भुताचा"

  331

मुंबई : स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरुणाची धमाल गोष्ट "एक डाव भुताचा" या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवणारा टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.


रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने एक डाव भूताचा या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.


स्मशानात जन्म झाल्यानं सतत भूत दिसणाऱ्या तरुणाची भूमिका अभिनेता सिद्धार्थ जाधवनं निभावली आहे, तर मकरंद अनासपूरे भूताच्या भूमिकेत आहेत. माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्टीला प्रेमकहाणीचा तडकाही आहे. त्यामुळे मनोरंजक कथानक, सकस अभिनय असलेला हा चित्रपट आता मोठ्या पडद्यावर येण्याची प्रतीक्षा आहे. त्यासाठी ४ ऑक्टोबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Comments
Add Comment

Parag Tyagi trolled: शेफालीच्या मृत्युला २४ तास उलटत नाही, तोच पती पराग... युजर्सने केले ट्रोल

शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर लगेचच पराग त्यागी कुत्र्यासोबत फिरताना दिसला Parag Tyagi Was Seen Walking With Dog: शेफाली जरीवालाचा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

श्रेयस तळपदे शेफाली जरीवालाची बातमी ऐकून हळहळला!

मुंबई : 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील 'कांटा लगा' या गाण्यामुळे शेफाली जरीवाला हे नाव लोकप्रिय झालं होत.

शेफालीचा पती करतो काय ?

Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिनेविश्वात सध्या शोककळा पसरली आहे.वयाच्या अवघ्या

बिग बॉसचं शापित घर... शेफालीच्या आधी सुद्धा झालं होत सहा स्पर्धकांचा अकस्मात निधन...

अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला 'कांटा लगा' या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे प्रसिद्धीस पावली होती.सलमान

पराजूचा दगडू घेऊन येत आहे एक नवी कोरी प्रेमकहाणी...

प्रथमेश परबचा नवा सिनेमा... मुंबई लोकलला नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून संबोधलं जात. लोकलच्या प्रवासात