
मुंबई : मुंबई ते मांडवापर्यंत धावणारी 'रो रो बोट सेवा'चे विस्तारीकरण होणार आहे. आता रो रो बोट रेवदंडापर्यंत धावणार आहे. यामुळे मुंबई ते रेवदंडा हा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण होणार आहे. याच्याआधी यासाठी तब्बल चार तासांचा वेळ लागत होता. मात्र या निर्णायामुळे प्रवास करणाऱ्यांचे दोन तास वाचणार आहेत.
मुंबई ते रेवदंडा या विस्तारीकरणासाठी जेट्टी तब्बल १७५ कोटी रुपये खर्च करणार आहे. मुंबई रेवदंडा हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सूखकर होणार आहे. रेवदंडापर्यंतच्या विस्तारीकरणाची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. आता अखेर याला मान्यता मिळाली आहे.