नवी मुंबई : नुकतेच म्हाडातर्फे मुंबईत जारी करण्यात आलेल्या घरांच्या सोडतसाठी अर्ज प्रक्रिया आज समाप्त करण्यात आली. म्हाडाच्या या लॉटरीला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असताना आता सिडकोनेही सोडत (CIDCO Lottery) जारी केली आहे. या सोडतद्वारे सिडको नवी मुंबईत तब्बल ४० हजार घरांची सोडत काढणार आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सिडकोच्या घरांची बंपर लॉटरी निघणार आहे. त्यामुळे मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोने नवी मुंबईत रेल्वे स्थानकाशेजारी उभारलेल्या घरांची लॅाटरी निघणार आहे. यामध्ये ग्राहकांना कोणत्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाचे घर पाहिजे हे निवडण्याची मुभा देखील देण्यात आली आहे. वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर आणि नेरूळ या रेल्वे स्थानकांजवळ ही घरे असणार आहेत. त्यामुळे या लॉटरीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विमानतळाचे कामही प्रगतीपथावर
सिडकोचे घरांसह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही प्रगतीपथावर आणले आहे. विमानतळाचे एक रनवे पूर्ण झाला असून दुसऱ्याचे काम सुरू आहे. काही दिवसात येथून सुखोई विमानाची चाचणी केली जाणार आहे.