डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव झाल्याने तरुणाचा मृत्यू तर पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

  125

पंढरपूर : राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पाला अनंत चतुदर्शीनिमित्त (Anant Chaturdashi 2024) निरोप देण्यासाठी राज्याच्या विविध भागांमध्ये सार्वजनिक मंडळाचे गणपती विसर्जनसाठी डीजे आणि डॉल्बी साऊंडचा दणदणाट करण्यात आला. मात्र, या आनंदावर विरजण पडणारी घटना पंढरपूरमध्ये (Pandharpur) घडली.


पंढरपूर शहरातील डॉल्बी मालक अमोल खुटाले (Amol Khutale) हा शेगाव दुमाला येथे गणेश विसर्जन (Ganesh Visarjan 2024) मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड जोडत असताना या तरुणाला अचानक चक्कर आली आणि अमोल जागेवरच कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात उपचार सुरू असताना अमोल खुटाले यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


या घटनेनंतर पंढरपूर शहरातील सर्वात मोठे मंडळ असणाऱ्या श्रीमंत लोकमान्य मंडळाने आपल्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याने गणेश विसर्जन मिरवणूक रद्द केली.



पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


तर अहमदनगरमध्येही दुर्दैवी घटना घडली. ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे हे अहमदनगर पोलीस दलात कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काल तोफखाना आणि कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता. दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत ज्ञानेश्वर मोरे यांनी मराठी चित्रपटाच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला. गणपती विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर ते आपल्या घरी परतले. घरी गेल्यावर ज्ञानेश्वर मोरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अहमदनगर जिल्हा पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक