मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या घरी आनंदीआनंद आला आहे. त्यांची बेबी गर्ल अभिनेत्रीच्या घरी पोहोचली आहे. सध्या दीपिका छोट्या परीची देखभाल घेत आहे. रणवीरलाही बाबा झाल्यानंतरही प्रचंड आनंद झाला आहे.
छोट्या परीच्या आगमनानंतर दीपिकाच्या घरी आणखी एक खुशखबर समोर आली आहे. ती ही की अभिनेत्रीच्या कंपनीने १८४५ स्क्वे फूटचा नवा अपार्टमेंट खरेदी केले आहे. या अपार्टमेंटची किंमत १७.८ कोटी रूपये आहे.
हे अपार्टमेंट मुंबईच्या वांद्रे पश्चिम येथे आहे. १२ सप्टेंबरला याचे रजिस्ट्रेशन झाले आहे आणि डील इन झाली. यात ४ आणि ५ बीएचके अपार्टमेंट्स बनलेले आहेत.
दीपिकाचा फ्लॅट १५व्या मजल्यावर आहे. ३० हजार रजिस्ट्रेशन चार्जेस आणि १.०७ कोटी रूपये रजिस्ट्रीम्ध्ये लागले आहेत. रणवीर सिंहच्या आईने ५ सप्टेंबरला या बिल्डिंगमध्ये भाड्यावर घर घेतले आहे. त्यांचे महिन्याचे भाडे ८.२ लाख रूपये आहे. तर डिपॉझिट ७३.८ लाख रूपये आहे. ५५ महिन्यांसाठी रणवीरची आई भाड्याने राहणार आहे.
३३ महिन्यांपर्यंते ते ८.२ लाख रूपये दर महिन्याला भरतील. यानंतर पुढील २२ महिन्यांसाठी किंमत ९.४३ लाख रूपये भरतील.
मुलीसोबत दीपिका आणि रणवीर या नव्या घरात शिफ्ट होणार आहेत. त्यामुळे दीपिका आपल्या सासूच्या शेजारीच राहणार आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…