Kangana Ranaut Mumbai Bungalow : 'इमर्जन्सी'साठी कंगनाने मुंबईतील बंगला अवघ्या ३२ कोटींना विकला, पण पुढे काय?

मुंबई : पद्मश्री पुरस्कार मिळालेली चित्रपट अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) हिने मुंबईतील पाली हिल येथील तिचा बंगला अवघ्या ३२ कोटींना विकला आहे. बंगला विकण्यामागची तिची मजबुरी तिने सांगितली असून तिने तो आलिशान बंगला का विकला त्याचे कारण समोर आले आहे.


कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'माझा चित्रपट 'इमर्जन्सी' (Emergency) रिलीज होणार होता. या चित्रपटासाठी मी माझी सर्व वैयक्तिक मालमत्ता गुंतवली होती. मात्र सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही.


मालमत्ता फक्त संकटकाळासाठी असते. त्यामुळेच तिने हा बंगला पैशासाठी विकला. कंगनाने या बंगल्याची किंमत ४० कोटी रुपये ठेवली होती. पकंतु तिला पैशांची गरज होती. यामुळे मजबुरीमुळे तिने तो बंगला अखेर ३२ कोटींना विकला.



कंगनाने २०१७ मध्ये हा बंगला २० कोटी रुपयांना खरेदी केला होता. या बंगल्यातून त्यांचे कार्यालयही चालवले जात होत. हा बंगला विकत घेतल्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये तेथे मणिकर्णिका फिल्म्ससाठी कार्यालय सुरू केले होते.


सप्टेंबर २०२० मध्ये कंगनाच्या या बंगल्याचे मुंबई महापालिकेने खूप नुकसान केले होते. कथित अनधिकृत बांधकामाच्या आधारे ते पाडण्यात आले होते. ज्याची त्यावेळी खूप चर्चा झाली.



अंधेरीत नवीन कार्यालयाची जागा १.५६ कोटींमध्ये खरेदी


वांद्रे येथील बंगला विकल्यानंतर कंगनाने अंधेरी येथे १.५६ कोटी रुपयांना नवीन कार्यालय विकत घेतले आहे. ४०७ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले हे ऑफिस १९व्या मजल्यावर ३८,३९१ रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने खरेदी केल्याचे सांगितले जाते.


कंगनाचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट ६ सप्टेंबरला रिलीज होणार होता. मात्र सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने त्याचे प्रदर्शन थांबवण्यात आले. कंगनाने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चित्रपट पुढे ढकलल्याची माहिती दिली होती. कंगनाने लिहिले होते- जड अंत:करणाने मी जाहीर करते की, माझ्या दिग्दर्शित 'इमर्जन्सी' हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे, आम्ही अजूनही सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राची वाट पाहत आहोत, लवकरच रिलीजची नवीन तारीख जाहीर केली जाईल. मात्र अद्यापही सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने पुढे काय होणार? घरदार विकावे लागलेल्या कंगनाच्या या वादग्रस्त चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळेल का? चित्रपट चालेल का? असे अनेक प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत.

Comments
Add Comment

Maharashtra Cabinet Meeting : राज्याच्या विकासाला गती; FDI साठी विशेष अधिकारी पद, जात प्रमाणपत्र, रेल्वे निधी... कॅबिनेटचे ७ मोठे धमाके!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (२८ ऑक्टोबर) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी केईएम रुग्णालयाला दिले व्हेंटिलेटर दान!

मुंबई: केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विख्यात गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या