Nitesh Rane : रक्तात गद्दारी असणाऱ्याने नितीन गडकरी आणि आनंद दिघे यांचं नाव स्वत:च्या थोबड्यातून घेऊ नये!

दलाली करणाऱ्याला निष्ठवान कार्यकर्ता कधीच कळणार नाही!


आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतला फटकारले


मुंबई : आज सकाळी संजय राजाराम राऊतने (Sanjay Raut) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संदर्भात मुक्तफळ उधळली आहेत. पण ज्याच्या रक्तातच गद्दारी आहे, दलाली आहे त्या माणसाला नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, आनंद दिघे आणि भाजपा पक्षाचे निष्ठवान कार्यकर्ता हा कधीच कळणार नाही. त्यामुळे त्याने त्याच्या थोबड्यातून त्यांचे नाव घेऊ नये, असे म्हणत आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राजाराम राऊतला फटकारले.


नितीन गडकरी यांचे देशात आणि महाराष्ट्रात वेगळं स्थान आहेच. तसेच भाजपा पक्षामध्ये देखील एक मानाचं स्थान आहे. पक्षाची निष्ठा काय असते हे नितीन गडकरी यांनी वारंवार दाखवून दिलेले आहे. भाजपा पक्षाचा प्रधानमंत्री असणं हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून 'राष्ट्रप्रथम' हे भाजपा पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे ब्रीदवाक्य आहे. नितीन गडकरी हे एक निष्ठावान कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांची आणि संजय राजाराम राऊत सारख्या सापाची तुलना देखील करु शकत नाही, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली.



संजय राऊतच्या रक्तात गद्दारी


संजय राजाराम राऊतने २०१९ साली स्वत: मुख्यमंत्री बनण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. 'मी उद्धव ठाकरेपेक्षा वरचढ आहे, मलाच मुख्यमंत्री बनवा' यासाठी शिवसेनेच्या असंख्य आमदारांना सामना कार्यालयातून फोन करुन बोलावून घेतले. पण आमदारांकडून प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या मागे नाक रगडत फिरायला लागला. त्यावेळीच याच्या रक्तात किती गद्दारी भरली हे दिसून आले.


संजय राजाराम राऊतमध्ये असलेली गद्दारी नितीन गडकरी यांच्या विचारातही नाही. त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं, भाजपा पक्ष आणि एनडीएचं पंतप्रधान होणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यासाठी ते कुठलंही पद्धतीची तडजोड करणार नाहीत. म्हणून तू नितीन गडकरी यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याचं नाव मुखातूनही घेऊ नकोस, असे नितेश राणे यांनी ठणकावून सांगितले.



संजय राऊतचे विचार धर्मवीर-१ चित्रपटात दाखविले


ज्या ठाण्याने शिवसेनेला सत्ता मिळवून दिली, आनंद दिघे यांनी जिथे न्याय मिळवून दिला तिथे लेडिज बारसारखे पैसे उधळले गेले, अशी टीका संजय राऊतने केली होती. त्या टीकेला चोख प्रत्युत्तर देत नितेश राणे यांनी म्हटले की, याबाबत शिवसेना आणि शिंदे गटातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपलं मत व्यक्त केले आहे. पण आरोप करणारा संजय राजाराम राऊतला मुंबईचा जुना पवित्र महापौर बंगल्यावर तुझ्या मालकाच्या काऱट्या मुलाने जे नाईट क्लब करुन ठेवलं होत. बॉलिवूडमधले महिला कलाकारांना बोलावून पार्टी करायचा, पैसे उधळायचा, नाचगाणी करायचा ते तुला चालायचं का? असा प्रश्न उपस्थित केला.


त्यामुळे आनंद आश्रमामध्ये अशा कोणत्याही गोष्टी होऊ नये या मताचे आम्ही सर्वजण आहोत. आनंद दिघे यांवर प्रेम करणारे राज्यभरातील असंख्य लोक आहेत. पण संजय राजाराम राऊतचे याबाबत काय विचार होते ते धर्मवीर १ चित्रपटात दाखविले गेले आहेत. म्हणून संजत राजाराम राऊतने आनंद दिघे यांचे नाव स्वत:च्या थोबड्यातून घेऊ नये, असेही नितेश राणे यांनी म्हटले.

Comments
Add Comment

२०१० पासून टियर १ शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांच्या किमतीत मोठी सुधारणा: कॉलियर्स

मुंबई: दिलेल्या नव्या अहवालातील माहितीनुसार, प्रमुख शहरांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासामुळे, परवडणाऱ्या

वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

विरार : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व

'हायटेक केसपेपर नोंदणी' ठरतेय डोकेदुखी !

अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांब रांगा अलिबाग  : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आयुष्मान

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य