Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीGarlic Price Hike : गणेशोत्सवात भाज्यांसह लसुणचेही चढेदर!

Garlic Price Hike : गणेशोत्सवात भाज्यांसह लसुणचेही चढेदर!

मुरबाड : श्रावण महिना व ऐन गणेशोत्सवाच्या काळातही भाजी- पाल्याचे भाव कडाडले आहेत त्यामुळे सामान्य माणसाचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. लसुन चा भाव ३६० प्रती किलोवर गेला आहे, कोथिंबीर, मटार, फ्लावर, मिरची, सुरण, शिमला, वांगी, लिंबू, मेथी, ही चढ्या भावाने विक्री होत आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या काळात भाजीपाला महाग अशीच प्रतिक्रिया महिला वर्गाच्या तोंडून ऐकावयास मिळत होती. पंरतु गणेशउत्सवाच्या म्हणजेच सप्टेंबर महिन्यात भाज्यांचे दर स्थिर असल्याचे चित्र दिसून येत आहे सर्वसामान्य माणसावर रडण्याची वेळ आली आहे. असेच रोजच्या आहारात कोणती भाजी खावी हेच काही कळेना सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया उमटत आहे. परंतु देशात व राज्यात जरी महागाईचा भडका उरला असला तरी भाजीपाल्याचे भाव स्थिर आहेत. याबाबत शिवळे-तुळई-कॉलेज रस्त्यावर असलेले श्री गणेश कृपा भाजी व फ्रुट मार्टचे व्यापारी प्रवीण कापडी यांनी बोलताना सांगितले की सध्या मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. परंतु यंदा श्रावण मास मध्ये व भाद्रपद मध्ये अगदी शाकाहारी जेवण करणाऱ्या मंडळींना भाजीपाल्याचे भाव काही प्रमाणात स्थिर असल्याच्या प्रतिक्रिया वयोवृद्ध ग्राहक व महिला वर्ग आमच्या बोलताना देत आहेत.

श्रावण महिना व गणेश उत्सवाच्या काळात फळभाज्या, पालेभाज्या रानभाज्या यांना मागणी असते. परंतू सध्या श्रावण महिना असूनही भाजीपाला दर स्थिर आहेत मात्र यंदा लसूण ३६० किलो झाला असून सर्वसामान्या च्या डोळ्यात पाणी आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच कमरडे मोडले असल्याचे चित्र दिसून येत आहे. जनतेच्या रोषाला सामोरे जातांना हाच लसूण राजकारण्यांना सत्तेवर बसून देईल का ? असा प्रश्न विचारला जात आहे. अहोरात्र शेतात घाम गाळून शेतकरी अन्नधान्य, भाजीपाला पिकवतो. मात्र भाववाढीमध्ये शेतकऱ्यांपेक्षा दलालांनाच नफा जास्त होतो. अनेक दलाल नफेखोरी साठी मालाची साठवणूक करतात. कृत्रिम टंचाई बाजारपेठेत निर्माण करतात त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

प्रति एक किलो होलसेल भाज्यांचे भाव पुढीलप्रमाणे –

लसूण ३६०,कोथिंबीर १५० जुडी,,मटार २२० किलो,फ्लॉवर १०० किलो,मिरची ७० किलो,सुरण ८० किलो, शिमला ६० किलो,फरशी ८० किलो,वांगी ५९ किलो, लिंबू १४० किलो,गाजर ५० किलो,शेवगा ५० किलो,गवार ६० किलो,घेवडा ८० किलो,गवार ७० किलो,मेथी ४० जुडी, फरशी ८० किलो, लसूण १६० किलो,कोथिंबीर ३० किलो,मटार ८० किलो,फ्लॉवर २८ किलो,मिरची ८० किलो,सुरण ५० किलो,,शिमला ५० किलो,,फरशी ८० किलो,वांगी ३० किलो,लिंबू १०० किलो,गाजर ३० किलो,शेवगा ८० किलो,,गवार ६० किलो,कांदा ५० किलो,बटाटा ३५ किलो आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -