ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमधील वाहतूक मार्गात बदल!

अमरावती : अमरावती शहरात १६ सप्टेंबर रोजी मुस्लीम बांधवाचे ईद-ए-मिलादनिमित्त मिरवणुक काढण्यात येतात. या कालावधीत मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत.


वाहतुकीचा पर्यायी मार्ग ट्रांसपोर्टनगर ते नागपुरी गेट चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची म एकतर्फा वाहतुक सुरू राहील. चित्रा चौक ते पठाण चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक प्रभात टॉकीज व दीपक चौक मार्गे वळविण्यात येईल. हनुमान नगर पोलीस चौकी ते पठाण चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकाराचा जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक महाजनपुरा मार्गे वळविण्यात येईल.


जवाहर गेट ते टांगा पडाव या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक सराफा - गांधी चौक- जयस्तंभ मार्गे वळविण्यात येईल. लालखडी ते पठाण चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक लालखडी रिंगरोड मार्गे वळविण्यात येईल.


तसेच वाहन चालकांनी या अधिसूचनेचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्याविरुध्द मोटार वाहन कायद्या व महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत करवाई करण्यात येईल. हा आदेश १६ सप्टेंबरच्या (एक दिवस मागे-पुढे चंद्र दर्शनानुसार) सकाळी ८ ते दुपारी ८ वाजेपर्यंत लागू राहील, सर्व नागरिकांनी वाहतुक मार्गातील बदलाबाबत सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी केले आहे.

Comments
Add Comment

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला