Lalbaugcha Raja Darshan : लालबागच्या राजा चरणी भेदभाव! सामान्यांना धक्काबुक्की, व्हीआयपींना पायघड्या

अभिनेत्री सिमरनसोबत घडला धक्कादायक प्रकार


मुंबई : सध्या महाराष्ट्रभर गणेशोत्सवाची (Ganesh Utsav 2024) धूम आहे. विशेषत: मुंबईतील लालबाग-परळ या भागात गणेशोत्सवाचा एक वेगळा उत्साह दिसून येत आहे. एकीकडे भाविकांचा बाप्पाच्या दर्शनासाठी आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू मानला जाणाऱ्या लालबागचा राजा ठिकाणी (Lalbaugcha Raja Darshan) मुजोरपणा सुरु असल्याचे दिसून येत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातील लाखो भाविक चरण दर्शनासाठी येत असतात. परंतु राजाच्या चरणी सामान्य लोक आणि व्हीआयपी लोकांमध्ये भेदभाव करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे.



भाविकांसोबत मुजोरीपणा


सध्या लालबागच्या राजाचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एकीकडे लालबाग राजाच्या मंडपात काही जण आरामशीर दर्शन घेत आहेत, फोटो काढत आहेत. तर दुसरीकडे सुरक्षारक्षकाकडून सर्वसामान्य भक्तांसोबत मुजोरपणा सुरु आहे. त्यामुळे हा मुजोरीपणा कधी संपणार, असा सवाल उपस्थित होत आहे.



सिमरन बुधरूपचा दर्शनाला जाण्याचा वाईट अनुभव


‘पंड्या स्टोअर’ फेम अभिनेत्री सिमरन बुधरूप तिच्या आईबरोबर लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गेली होती. तिथे तिच्याबरोबर धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सिमरनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने दर्शनाला जाण्याचा अनुभव खूप वाईट होता, असे व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. सिमरनने व्हिडीओ शेअर करून लालबागचा राजा पंडालच्या बाऊन्सर्सनी तिला आणि तिच्या आईला धक्काबुक्की केली असा आरोप केला आहे.


त्याचबरोबर सिमरनची आई फोटो काढत असताना कर्मचाऱ्यांपैकी एका व्यक्तीने तिचा फोन हिसकावून घेतला. ती रांगते माझ्या मागे होती. तिने दर्शनासाठी जास्त वेळ घेतला नव्हता. तिच्यापुढे मी असल्याने मी दर्शन घेत होते आणि ती मागे असल्याने फोटो काढत होती. आईने फोन परत मागण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी तिला धक्काबुक्की केली' असे सिमरनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहले आहे.




Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम