Ganesh Utsav : पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणार! पहा पुढील ११ वर्षांत कधी असेल श्रीगणेश चतुर्थी?

Share

पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितली माहिती

ठाणे : गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या ! ही भक्तांची हाळी यंदा गणपती बाप्पाने ऐकली असुन पुढल्या वर्षी गणपती बाप्पा ११ दिवस लवकर येणार आहेत. दीड दिवसाच्या बाप्पांना ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात गणेशभक्तांनी निरोप दिला. भक्तांची हीच हाक बाप्पाने देखील ऐकली असून पुढच्या वर्षी बाप्पाचं आगमन खरोखरच लवकर होणार आहे. पुढच्या वर्षी श्रीगणेश चतुर्थी बुधवार २७ ऑगस्ट २०२५ रोजी येणार असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यानी सांगितले.

या विषयी अधिक माहिती देताना दा. कृ. सोमण म्हणाले की, यावर्षी ०७ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे आगमन झाले तर गौरी-गणपतीचे विसर्जन सहाव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी १२ सप्टेंबर रोजी होत आहे. पुढच्या वर्षी गौरी- गणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी होणार आहे. पुढच्या वर्षी मंगळवार ०२ सप्टेंबर २०२५ रोजी गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे. तसेच पुढच्या वर्षी अनंत चतुर्दशी ११ व्या दिवशी म्हणजेच शनिवार ६ सप्टेंबर २०२५ रोजी येणार आहे.

वाजत गाजत शनिवारी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. संपूर्ण शहरातील वातावरण भक्तीमय झाले आहे. संपूर्ण राज्यभरासह गणेशोत्सव प्रसिद्ध असणाऱ्या कोकणात देखील दीड दिवसांच्या आणि पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. संपूर्ण राज्यभरात दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे मोठ्या जयघोषात, जड अंतःकरणाने विसर्जन करण्यात आले. यावर्षी गौरी-गणपतीचे विसर्जन सहाव्या दिवशी होत आहे. यावषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, पुढच्या वर्षी गौरी-गणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी होणार आहे. मंगळवार २ सप्टेंबर २०२५ रोजी गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे. तसेच अनंत चतुर्दशी अकराव्या दिवशी शनिवार ६ सप्टेंबर २०२५ रोजी येणार आहे. गेल्या वर्षी १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी होती. त्यामुळे यावर्षी बाप्पा १२ दिवस लवकर आले.

पुढील ११ वर्षातील श्रीगणेश चतुर्थी

  • बुधवार २७ ऑगस्ट २०२५
  • सोमवार १४ सप्टेंबर २०२६
  • शनिवार ४ सप्टेंबर २०२७
  • बुधवार २३ ऑगस्ट २०२८
  • मंगळवार ११ सप्टेंबर २०२९
  • रविवार १ सप्टेंबर २०३०
  • शनिवार २० सप्टेंबर २०३१
  • बुधवार ८ सप्टेंबर २०३२
  • रविवार २८ ऑगस्ट २०३३
  • शनिवार १६ सप्टेंबर २०३४
  • बुधवार ५ सप्टेंबर २०३५

Recent Posts

कोकणातील माकडे व वानरांचे निर्बीजीकरण करणार!

निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…

31 minutes ago

६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत जाहीर

गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…

43 minutes ago

SRH vs MI, IPL 2025: सनरायजर्स हैदराबादचे मुंबईला १४४ धावांचे आव्हान, क्लासेनची जबरदस्त खेळी

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…

1 hour ago

पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार!

राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…

1 hour ago

IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब…पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…

2 hours ago

अधिकाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास होणार निलंबनाची कारवाई

मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…

2 hours ago