Pune News : पुणे विद्यापीठात पीएचडी प्रवेशासाठी २,७६१ विद्यार्थी पात्र

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभाग व विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रामधील पीएचडी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या पीएचडी प्रवेश परीक्षेचा (पेट) निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेसाठी २ हजार ७६१ विद्यार्थी पात्र, तर ६ हजार ३४६ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत.


विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने पीएचडी प्रवेश पूर्वपरीक्षा घेण्यात आली. त्यासाठी १० हजार ७५२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील १ हजार ६४५ विद्यार्थी परीक्षेस अनुपस्थित राहिले. विद्यापीठातर्फे लवकरच प्रवेशासंदर्भातील प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे. विद्यापीठातील विभाग व संलग्न संशोधन केंद्रामधील सुमारे १२०० जागांसाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, स्वायत्त महाविद्यालयांमधील रिक्त जागांची संख्या अद्याप यात समाविष्ट केलेली नाही. त्यामुळे पीएचडी प्रवेशासाठी उपलब्ध जागांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनमध्ये जाऊन स्वतःचा निकाल डाऊनलोड करून घ्यावा, असे परिपत्रक विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि