Come Back Serial : टीआरपी वाढीसाठी सोनी टीव्हीचा मोठा निर्णय! अनेक मालिका होणार बंद

'या' मालिकांचा होणार कमबॅक


मुंबई : सध्या टीव्ही इंडस्ट्रीत (TV Industry) सगळीकडे टीआरपीची (TRP) मोठी स्पर्धा सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सिनेसृष्टीत एकेकाळी गाजलेले चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतही मालिकांच्या टीआरपी वाढण्यासाठी अनेक निर्णय घेतले जात आहेत. हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमधील सोनी वाहिनीने देखील मालिकांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोनी टीव्हीवर (Sony TV) सुरु असणारे अनेक मालिका बंद करण्यात येणार असून पूर्वीच्या काही मालिका पुन्हा टीव्हीवर पाहायला मिळणार आहेत.


सोनी टीव्हीवर महिनाभरापूर्वी प्रसिद्ध कॉमेडियन झाकीर खानचा 'आपका अपना झाकीर' हा शो सुरू झाला होता. मात्र सोनी टीव्ही वाहिनीने तो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सुंबूल तौकीर खानच्या 'काव्या' मालिकेसह अनेक मालिका अडचणीत येणार आहेत.



कोणत्या मालिका करणार कमबॅक?



  • पूर्वी सोनी टीव्ही वाहिनीवरील 'सीआयडी' (CID) या मालिकेने सर्वाधिक टीआरपी गाठला होता. या मालिकेसह एसीपी प्रद्युमन, दया-अभिजीत यांच्या साकारलेल्या भूमिकेमुळे प्रेक्षकांनी भरघोस प्रेम दिले होते. त्यामुळे आता लवकरच सोनी टीव्ही वाहिनीवर सीआयडी'चे जुने एपिसोड्स पुन्हा दाखवले जाणार आहेत.

  • त्याचबरोबर 'क्राइम पेट्रोल' (Crime Petrol) ही मालिका देखील पुन्हा दाखवली जाणार आहे.

  • याशिवाय 'मेरे साई' (Mere Sai) या शोलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते, त्यामुळे आता तो पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

  • तसेच 'इंडियाज बेस्ट डान्सर', 'इंडियन आयडॉल'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


कोणत्या मालिकांचा निरोप?


'काव्या- एक जज्बा, एक जुनून', 'पुकार दिल से दिल तक' आणि 'ज्युबली टॉकीज' या डेली सोपचे चित्रीकरण आधीच बंद करण्यात आले आहे. सध्या मालिकांचे चित्रीकरण पूर्ण झालेले भाग प्रसारीत केले जाणार आहेत. त्यामुळे काही आठवडे या मालिकांचे प्रसारण होणार आहे.

Comments
Add Comment

Actress Ananya Raj : अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन; झोपेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या