Team india: बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ या महिन्यात बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिला सामना चेन्नईमध्ये १९ सप्टेंबरपासून तर दुसरा सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे.


संघात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतचे पुनरागमन झाले आहे. ही भारतीय संघाची मार्च २०२४ नंतर पहिली रेड बॉल कसोटी मालिका आहे. गेल्या मालिकेत इंग्लंडला ४-१ असे हरवले होते. दुसरीकडे ही सीरज भारताचे प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीरची पहिली रेड बॉल मालिका असेल.



या ४ खेळाडूंना स्थान नाही


या मालिकेसह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन होत आहे. त्यांने टी-२० वर्ल्डकप फायनल नंतर ब्रेक घेतला होता. हा फायनल सामना २९ जूनला झाला होता. सोबतच दुसरा विकेटकीपर म्हणून ध्रुव जुरेलची निवड करण्यात आली आहे.


 


पहिल्या कसोटीसाठी श्रेयस अय्यर, देवदत्त पड्डिकल, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांना स्थान मिळालेले नाही. केएल राहुलला फलंदाज म्हणून सामील करण्यात आलेले आहे. कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आलेले आहे. तर स्पिनर म्हणून आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव यांची निवड करण्यात आली आहे.



६३४ दिवसानंतर पंतचे पुनरागमन


ऋषभ पंतवर साऱ्यांच्या नजरा टिकून होत्या. त्याचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. पंत ६३४ दिवसांनी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात पुनरागमन करत आहे. एका रस्ते अपघातात जखमी झाल्यानंतर तो संघाबाहेर होता. बांगलादेशविरुद्धची ही कसोटी मालिका आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या हिशेबाने महत्त्वाची असेल. या वर्षाच्या अखेरीस ही स्पर्धा असणार आहे.



पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

Comments
Add Comment

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर