Kurla Fire : कुर्ला परिसरातील रहिवासी इमारतीला भीषण आग; जीवितहानी नाही!

  162

मुंबई : लोअर परेलमधील कमला मिल कंपाउंड परिसरातील टाईम्स टॉवरला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. मुंबईतील हे प्रकरण ताजे असताना आज पुन्हा अशीच एक घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंबईत सर्व ठिकाणी गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. मात्र अशातच मुंबईतील कुर्ला परिसरातील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या मदतनीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र मुंबईत सततच्या घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास मुंबईतील कुर्ला पूर्व येथील रेल्वे स्थानकाजवळील सवेरा या रहिवाशी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. सवेरा इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील डकला आग लागली. घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी मुंबई पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. आग लागल्यानंतर संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या इमारतीला आग लागण्याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.

Comments
Add Comment

BEST Bus Accident : मुंबईच्या गिरगावात बेस्ट बस ५ फूट खोल खड्ड्यात गेली अन्…

मुंबई : मुंबईमधून गिरगाव परिसरात मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बसचा अपघात झाला आहे. गिरगाव येथील मेट्रो स्टेशनजवळ

मेट्रो ९ चा दहिसर, काशिगाव पहिला टप्पा डिसेंबरमध्ये सेवेत

मुंबई : दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यानच्या मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक ९ प्रकल्पाने एक महत्त्वपूर्ण टप्पा

मनपा कार्यालयात विजेचा अनावश्यक वापर

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या तसेच ऊर्जा विभागाच्या वतीने विजेची बचत करण्याचे आवाहन सर्वांना करण्यात येत असून

बोरिवली ते ठाणे भुयारी रस्ता प्रकल्प पुनर्वसनाला गती

एमएमआरडीएकडून तीन पर्यायांची घोषणा मुंबई :मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) ठाणे

मोघरपाडा येथे एमएमआरडीए उभारणार जागतिक दर्जाचा मेट्रो कार डेपो

मेट्रो मार्गिका ४, ४ ए, १० व ११ चे संचालन, देखभाल येथून होणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने

Health: वाढता लठ्ठपणा आरोग्यासाठी धोक्याची घंटा

मुंबई (प्रतिनिधी) : स्थूलपणा हे अनेक आजारांचे प्रमुख कारण आहे. हृदयाचे आजार, मधुमेह आणि काही प्रकारचे कॅन्सर