मुंबई : यंदाच्या गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi 2024) अनेक ग्रहांच्या चाली बदलत असल्यामुळे अनेक शुभ योग तयार होत आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उद्या संपूर्ण राज्यभरात गणरायाचे आगमन होणार आहे. यादिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, ब्रम्ह योगासारखे शुभ योग बनत आहेत. हा काळ अनेक राजयोगांनी संपन्न झाल्यामुळे याचा विशेष लाभ काही राशींवर होणार आहे. या राशीतील लोकांवर बाप्पाची विशेष कृपा राहणार असून त्यांचे भाग्य देखील उजळणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या रास.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांवर गणरायाची विशेष कृपा राहणार असून त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होऊ शकणार आहे. कौटुंबिक जीवन सुधारेल आणि आई-वडिलांसोबतच्या नातेसंबंधात गोडवा वाढेल. त्याचबरोबर कामाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरतील आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. यामुळे तुमची बौद्धिक क्षमताही वाढेल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीचे लोक या काळात जे बोलतील त्याचा लोकांवर प्रभाव पडू शकणार आहे. तसेच सोशल मीडियावर देखील अधिक प्रसिद्धी मिळवू शकता. जुनी प्रलंबित कामे यावेळी पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी राहील आणि याचबरोबर कुटुंबात एखादा नवीन पाहुणा येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाने सर्वांचे लक्ष वेधून घ्याल आणि सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. तब्येतही सुधारेल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थीचा काळ शुभ राहील. श्रीगणेशाच्या कृपेने नशीब तुमच्या सर्व कामात साथ देईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तुम्हाला काही नवीन लोक भेटतील, जे चांगले मार्गदर्शक सिद्ध होतील आणि त्यांचा सल्ला तुमच्या जीवनात बदल घडवून आणेल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीचे लोक समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतील. तुमच्या कामाच्या पद्धतीत थोडासा बदल करून तुम्ही उत्तम यश मिळवू शकता. हा काळ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचा असेल आणि पालकांना तुमचा अभिमान वाटेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
(टीप : वरील सर्व गोष्ट ज्योतिषशास्त्रांच्या आधारे दिली आहे. ‘प्रहार’ अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.)