Monday, May 19, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

अग्नितांडव आणि अपघात! मुंबईत बांधकाम आणि घरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर!

अग्नितांडव आणि अपघात! मुंबईत बांधकाम आणि घरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर!

मुंबई : काही दिवसांपूर्वी (Fires and accidents) बोरिवली येथील २२ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीत ४ नागरिक जखमी झाले होते. तर त्यातील एका वृद्ध नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मुंबईतील (Mumbai News) आगीची ही घटना ताजी असताना पुन्हा लोअर परेल परिसरातील कमला मिल कंपाऊंडमधील टाईम्स टॉवरला भीषण आग (Mumbai Kamala Mills Fire) लागल्याची घटना घडली आहे. यामुळे मुंबईतील बांधकाम आणि घरांच्या सुरक्षेचा (Construction and housing safety) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



मालाडमध्ये २३ मजली इमारतीचा स्लॅब कोसळून ३ ठार, ३ जखमी


मालाड येथील हाजी बापू मार्गावरील गोविंद नगर येथील बांधकाम सुरू असलेल्या नवजीवन या इमारतीच्या २० व्या मजल्याच्या छताचा काही भाग गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत.


मालाड येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (झोपु) बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. मालाड पूर्व येथील नवजीवन इमारतीमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास ही धक्कादायक घडना घडली.



विक्रोळीत लिफ्टच्या डक्टमध्ये पडून दोघांचा मृत्यू , लेबर कॉन्ट्रॅक्टरविरोधात गुन्हा दाखल


विक्रोळी येथील घटनेत लिफ्टच्या डक्टमध्ये पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रत्नाकर फकिरा मुनी (३१) आणि उमा राजेंद्र सामल (२१) अशी मृतांची नावे असून मूळचे दोघे ओडिशाचे रहिवासी आहेत. या प्रकरणी लेबर कॉन्ट्रॅक्टर अरविंद हरजी रामजीआनी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.



चेंबूरमध्ये घराचा स्लॅब कोसळून दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू


चेंबूर (पश्चिम) भागात बुधवारी सायंकाळी एकमजली घराचा स्लॅब आणि लोखंडी अँगल कोसळल्याने दीड वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सरस्वती गल्लीत घडलेल्या या दुर्घटनेत, छोटी खुशी साळवे गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या दुर्घटनेत ३५ वर्षीय कविता साळवे जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.



विद्याविहार आणि विक्रोळी येथेही घडल्या दोन दुर्घटना


चेंबूरमधील या दुर्घटनेच्या काही तासांपूर्वीच मुंबईच्या पूर्व उपनगरातील विद्याविहार आणि विक्रोळी येथे दोन इमारत दुर्घटना घडल्या.


विद्याविहारमध्ये एक बांधकाम सुरू असलेल्या १५ मजली इमारतीची बांबूची संरचना कोसळली, ज्यात दोन कामगार नबियाद शेख (२६) आणि मोहन शेख (३८) जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.


विक्रोळीतील वर्षानगर भागात डोंगरावरच्या घराची भिंत कोसळून दोन व्यक्ती जखमी झाल्या. त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला आणि स्थानिक डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. या दुर्घटनेमुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून दोन घरे रिकामी करण्यात आली असून रहिवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.


या दुर्घटनांमुळे मुंबईत बांधकाम आणि घरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या सर्व घटनांच्या कारणांची तपासणी करत आहेत.




Comments
Add Comment