मुंबई : गणपती बाप्पाचे आगमन (Ganeshotsav) अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. या ७ ते १७ सप्टेंबर या १० दिवसांच्या गणेशोत्सव काळात वाहन तसेच पादचाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने मुंबई वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे. १० दिवस गणेशोत्सवासाठी पोलिसांनी शहरात ५ हजारांहून अधिक पोलीस तैनात केले आहेत. लोकप्रिय गणपती मंडळ लालबाग, गिरगाव, अंधेरी याभागात दीड, पाच, सात आणि दहा दिवस अर्थात अनंत चतुर्दशीपर्यंत मोठा बंदोबस्त असणार आहे.
गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी पोलिसांनी हेल्प डेस्क उभारले आहेत. रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच वाहतूक सुरळीत व्हावी आणि वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी या १० दिवसांच्या काळात भाविकांनी अधिकाधिक सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याचे पोलिसांनी सांगितले आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलिसांनी बेस्टच्या बसेस, लोकल ट्रेन आणि मेट्रो सेवांमध्येही समन्वय साधला आहे. लोकांना हा सण शांततेत साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
लोकप्रिय गणेशोत्सव मंडळांकडे जाणारे अनेक रस्ते बंद करण्यात आले असून ते दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आले आहेत. लालबाग राजाच्या आजूबाजूचे रस्ते गर्दीच्या वेळी वाहनांना वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. मात्र वाहतूक विस्कळित होऊ नये, यासाठी आपत्कालीन वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत. अवजड वाहनांना मंडळांच्या आजूबाजूने गर्दीच्या वेळी मनाई आहे. मात्र भाजी विक्रेते, डॉक्टर, मेडिकल या सेवांशी संबंधित वाहनांना यात सूट आहे.
– घाटकोपर आरओबी
– करी रोड
– चिंचपोकळी आर्थर रोड जेल
– भायखळा
– मरिन लाइन्स
– सँडहर्स्ट रोड
– फ्रेंच आरओबी
– कॅनेडी
– महालक्ष्मी
– प्रभादेवी
– दादर टिळक आरओबी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…