Indian Special Railway : दिवाळी, छठपुजेदरम्यान धावणार ९६ विशेष गाड्या; भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय!

'असे' असेल वेळापत्रक


मुंबई : सध्या सणासुदीचा काळ सुरु असून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. अशातच गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता रेल्वेकडून विशेष रेल्वे (Special Train) गाड्या सोडण्यात आल्या. या गाड्यांना प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असताना भारतीय रेल्वेने (Indian Railway) मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानंतर भारतीय रेल्वेने आता दिवाळी आणि छट पूजेसाठी ९६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत या गाड्या सोडण्यात येणार असून गावाकडे जाणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे.



LTT-दानापूर दैनिक विशेष (४२ सेवा)



  • ट्रेन ०११४३ ही दैनंदिन विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), मुंबई येथून २२ ऑक्टोबर २०२४ ते ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिट वाजेच्या सुमारास दानापूरला पोहोचेल. (२१ सेवा)

  • ट्रेन ०११४४ (दानापूर ते LTT) - ही परतीची दैनंदिन विशेष ट्रेन २३ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत दानापूर येथून रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी LTT, मुंबई येथे पोहोचेल. (२१ सेवा)


थांबे - ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या ठिकाणी थांबेल.

सीएसएमटी-आसनसोल साप्ताहिक विशेष (८ सेवा)



  • ट्रेन ०११४५ (CSMT ते आसनसोल): ही साप्ताहिक विशेष ट्रेन २१ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबरपर्यंत दर सोमवारी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई येथून निघेल आणि आसनसोलला पहाटे २ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास पोहोचेल.(४ सेवा)

  • ट्रेन ०११४६ (आसनसोल ते सीएसएमटी): ही परतीची साप्ताहिक विशेष ट्रेन आसनसोल येथून २३ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरपर्यंत दर बुधवारी रात्री ९ वाजता सुटेल आणि सीएसएमटी, मुंबई येथे सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. (४ सेवा)


थांबे - दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय, सासाराम, देहरी-ऑन-सोने, गया, कोडरमा, एनएससी बोस जं गोमोह, धनबाद, आणि कुल्टी.



सीएसएमटी-गोरखपूर दैनिक विशेष (४२ सेवा)



  • ट्रेन ०१०७९ (सीएसएमटी ते गोरखपूर): ही दैनंदिन विशेष ट्रेन २२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर दरम्यान सीएसएमटी येथून रात्री १० वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून २० मिनिट वाजता गोरखपूरला पोहोचेल. (२१ सेवा)

  • ट्रेन ०१०८० (गोरखपूर ते सीएसएमटी): ही परतीची दैनंदिन विशेष ट्रेन गोरखपूरहून २४ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १२ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास सीएसएमटी येथे पोहोचेल. (२१ सेवा)


थांबे - गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, विरांगना लक्ष्मीबाई झांसी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद येथे थांबेल.



LTT-संत्रागाची साप्ताहिक विशेष (4 सेवा)



  • ट्रेन ०११०७ (LTT ते संत्रागाची): ही साप्ताहिक विशेष ट्रेन LTT, मुंबई येथून २९ ऑक्टोबर आणि ५ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता संत्रागाची येथे पोहोचेल. (२ सेवा)

  • ट्रेन ०११०८ (संत्रागाची ते LTT): ही परतीची साप्ताहिक विशेष ट्रेन ३१ ऑक्टोबर आणि ७ नोव्हेंबर रोजी संत्रागाची येथून दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास LTT, मुंबई येथे पोहोचेल. (२ सेवा)


थांबे - ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर येथे थांबेल.



आरक्षण तपशील


या फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन्सचे आरक्षण- ट्रेन क्रमांक ०११४३, ०११४५, ०१०७९ आणि ०११०७— ६ सप्टेंबर २०२४ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि अधिकृत वेबसाइट [IRCTC] http://www.irctc.co.in वर सुरू होईल


या विशेष गाड्यांच्या वेळा आणि थांब्यांच्या तपशीलवार माहितीसाठी, प्रवाशांना [Indian Railways Enquiry] http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देण्याचा किंवा NTES ॲप डाउनलोड करण्याचा सल्ला दिला जातो.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना