मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या नाव-नवीन प्रयोग घडताना दिसत आहेत. प्रेक्षकांसाठी चित्रपटाच्या माध्यमातून हटके आणि वेगवेगळे विषय भेटीला येत आहेत. आता एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे स्वप्न पाहणारा मराठी चित्रपटसृष्टीला चित्रपट म्हणून आगामी ‘येक नंबर’ कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हा बहुचर्चित चित्रपट येत्या दसऱ्याला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. राज ठाकरेंच्या आयुष्यावर आधारित असणारा ‘येक नंबर’ या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली असून या चित्रपटबद्धलची नवीन अपडेट समोर आली आहे. झी स्टुडिओज् बरोबर नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.’येक नंबर’ हा चित्रपट येत्या १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
दसऱ्याचे मुहूर्तावर ‘येक नंबर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. इतके दिग्गज या चित्रपटाशी जोडले गेले आहेत की, चित्रपटाच्या घोषणेपासूनच याची जोरदार चर्चा सुरु होती. त्यातच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरने ही उत्सुकता अधिकच वाढवली. या पोस्टरमधील तरुण कोण, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना प्रचंड इच्छा होती. तर आता या गोष्टीवरून पडदा उठला असून हा रांगड्या व्यक्तिमत्वाचा तरुण धैर्य घोलप असल्याचं समोर आलं आहे.
नुकताच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चित्रपटाचा नायक धैर्य घोलप एका वेगळ्याच रूपामध्ये पाहायला मिळत असून, त्याच्या मनातील क्रोध देहबोलीतूनच व्यक्त होत आहे. याच्याव्यतिरिक्त या पोस्टरमध्ये लक्षवेधी ठरत आहे, ती एक करारी नजर, जी महाराष्ट्राच्या परिचयाची आहे. या सगळ्यात अधिक भर घालत आहे, ते गूढ, रहस्यमयी संगीत. त्यामुळे या सगळ्यामागे नेमके काय दडलं आहे, हे जाणून घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. वरदा साजिद नाडियाडवाला आणि तेजस्विनी पंडित ह्या ‘येक नंबर’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. तर या चित्रपटाला, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला आपल्या संगीतावर ठेका धरायला लावणारे, अजय -अतुल यांचं धमाकेदार संगीत लाभलं आहे. संजय मेमाणे यांनी या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा सांभाळली आहे.
दिग्दर्शक राजेश मापुस्कर चित्रपटाबद्दल म्हणतात, “मला या चित्रपटासाठी एक असा नवीन चेहरा हवा होता, जो प्रेक्षकांना आपल्यातलाच एक वाटेल. त्यामुळे धैर्यचा रांगडा लूक मला या व्यक्तिरेखेसाठी अतिशय उत्तम वाटला. त्यानेही या व्यक्तिरेखेला उत्तम न्याय दिला आहे.”
निर्माती तेजस्विनी पंडित म्हणाली की, ”प्रेक्षकांची अनेकदा तक्रार असते की, मराठी चित्रपटांमध्ये तांत्रिकदृष्ट्या, सादरीकरणात भव्यता नसते. आमचा हाच समज दूर करण्याचा प्रयत्न आहे. या चित्रपटात अनेक कुशल, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञांचा सहभाग आहे. ही भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर नक्कीच दिसणार. या सगळ्याचे श्रेय या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला जाते.”
झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितलंय की, ‘प्रेक्षकांच्या मनात सुरूवातीपासूनच या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अशा चित्रपटाशी आम्ही जोडले गेलो आहोत, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. झी स्टुडिओजने नेहमीच प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट, हिट आणि दर्जेदार चित्रपट दिले आहेत. आमची ही परंपरा या चित्रपटातही कायम राहील, याची आम्हाला अगदी खात्री आहे.’
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…