Sports Day : क्रीडा दिनाचे औचित्य साधत पाण्यावर तरंगत केली योगासने!

अमरावती : हॉकीचे महान जादुगर मेजर ध्यानचंद यांची जयंती २९ ऑगस्ट निमीत्त देशात राष्ट्रीय क्रिडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच क्रीडा दिनाचे औचित्य साधत अमरावती शहर पोलिस आयुक्तलयातील पोलीस अंमलदार प्रविण आखरे यांनी जलतरण केंद्रात पाण्यावर तरंगत विविध प्रकारचे योगासने केली. प्रवीण आखरे हे जलतरण केंद्रात पोलिस अंमलदार म्हणून काम पाहत आहे.त्यांनी या पाण्यावर तरंगत व पाण्याच्या आत राहून योगासने करून 'इंडीया बुक ऑफ रेकाॅर्ड' व 'एशिया बुक ऑफ रेकाॅर्ड' आपल्या नावे केला आहे.त्यांच्या या कामगीरीमूळे अमरावती शहर पोलिस विभागाच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला गेला असून महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची शान वाढली आहे.

प्रवीण यांनी पूर व नियंत्रण तसेच शोध व बचावपथकांमध्ये काम केलेेले असून त्यादरम्यान आतापर्यंत ७८ मृतदेह पूराच्या पाण्याच्या बाहेर काढले आणि एकूण ५५ लोकांचे प्राण वाचविले आहेत. प्रवीण यांनी आज क्रीडा दिनानिमित्त पाण्यावर तरंगत पवनमुक्तासन, भुजंगासन, पश्चिमोत्तानासन, वज्रासन, धनुरासन, मत्स्यासन, पादहस्तासन, सर्वांगासन ही आसने केली.

Comments
Add Comment

स्थानिक निवडणूकांचे बिगुल वाजणार! पुढील आठवड्यात घोषणा

पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतीची निवडणूक मुंबई : पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकीची

हापूस आंबा बाजारात आला, असा झाला पहिला सौदा!

कोल्हापूर : समितीचे श्री शाहू मार्केट यार्डमधील जावेद इब्राहिमभाई बागवान यांच्या जे बी अँड सन्स फळ विभाग गाळा

खडसेंच्या घरी चोरी करणारे सापडले; ती 'सीडी' नेमकी आहे कुठे?

जळगावच्या चोरीचे धागेदोरे उल्हासनगरपर्यंत; सोनार आणि दोघांना अटक, मुख्य आरोपी अद्याप फरार जळगाव : राष्ट्रवादी

तृतीयपंथी समाज पुन्हा एकदा राजकारणात नवा अध्याय लिहिणार!

निवडणुकीत तृतीयपंथीयांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे - मैत्री संघटना, तृतीयपंथीयांची मागणी कोल्हापूर : स्थानिक

Breaking News : पोलीस महासंचालक पदासाठी ‘या’ ७ अधिकाऱ्यांची नावे 'शॉर्टलिस्ट'; सदानंद दातेंसह ‘हे’ आयपीएस शर्यतीत!

राज्याच्या गृहविभागाकडून UPSCकडे नावांची यादी रवाना; रश्मी शुक्ला ३१ डिसेंबरला निवृत्त होणार मुंबई :

असीम सरोदेंची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवले

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचा कठोर निर्णय; २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला मुंबई : न्यायव्यवस्थेबद्दल