मुंबई : बॉलीवूडमधलं सर्वात प्रसिद्ध कपल म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग… अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हे दोघे लवकरच आई-बाबा होणार आहे. दोघांच्या घरी लवकरच छोट्या गोंडस बाळाचं आगमन होणार आहे. त्याआधी या दोघांकडून खास तयारी केली जात आहे. या दोघांच्या १०० कोटींहून अधिक किंमतीच्या नव्या घराचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. सध्या सोशल मीडियावर या इमारतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही इमारत शाहरुख खानच्या घर ‘मन्नत’च्या अगदी जवळ आहे. हा भाग मुंबईतील सर्वात महागडा आणि पॉश म्हणून ओळखला जातो.
दीपिका आणि रणवीरने दोन वर्षांपूर्वी या इमारतीत एक अपार्टमेंट बुक केलंहोतं. तेव्हापासून घराचे काम सुरू होते. आता, दीपिका-रणवीर या सप्टेंबरमध्ये आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहे. त्यामुळे हे दोघेही बाळासोबत नव्या घरात शिफ्ट होणार असल्याची चर्चा प्रचंड सुरू झाली आहे.
दीपिका-रणवीरने मुंबईतील वांद्रे भागात अलिशान घर खरेदी केले आहे. ही इमारत किंग खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याच्या मागच्या बाजूस आहे. हे प्राइम लोकेशन असून या ठिकाणाहून समुद्राचे नयनरम्य दृष्य अगदी सुंदर दिसते. मागच्या दोन वर्षांपासूनया इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
पापाराजी विरल भयानी यांनी या बिल्डिंगचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट्स येत आहे. ही सगळी इमारत दीपिका-रणवीर यांची आहे का, असा प्रश्नसुद्धा नेटकऱ्यांनी विचारला आहे. एकाने म्हटले की फक्त ३ लोकांसाठी ही सगळी बिल्डिंग? आता, दीपवीरचे शेजारी शाहरुख असणार असल्याचेही एका नेटकऱ्याने म्हटलंय.
या घरासाठी रणवीर-दीपिका यांनी ११९ कोटी मोजले असल्याची माहिती समोर आल्यानंतर मोठी चर्चा झाली आहे. घर खरेदी करणं सर्वात महागड्या व्यवहारांपैकी एक व्यवहार समजला जातो. रणवीर-दीपिका यांनी १६, १७,१८ आणि १९ मजले खरेदी केले आहे. या अपार्टमेंटमध्ये एकूण ११,२६६ चौफूट चटईक्षेत्र आहे. त्यासोबतच १३०० चौफूटचा एक्सक्लूसिव्ह टेरेस देखील दिला आहे. इमारतीमध्ये १९ पार्किंग स्पेससुद्धा उपलब्ध आहे.
अपार्टमेंटसाठी दीपवीरने ११८.९४ कोटी रुपये मोजले आहेत. अशातच दोघांनी नोंदणीसाठी ७.१३ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले. यामुळे टेरेस क्षेत्र वगळून प्रति चौरस फूट दर हा १.०५ लाख रुपये इतका होतो. या अपार्टमेंटमध्ये सुविधाही खूप खास आहेत. एक वैयक्तिक जिम, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट स्पेस देखील आहे. या दोघांच्या प्रोफेशनल लाइफला लक्षात घेऊन तयार करण्यात आलं आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…