पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या परप्रांतीय नराधमांच्या विरोधात आदिवासी चौकात निषेध मोर्चा

जव्हार(मनोज कामडी)- बदलापूर ची घटना ताजी असतांनाच नुकतीच जव्हार तालुक्यातील ओझर गावातील एका गरिबी आदिवासी कुटुंबातील पाच वर्षीय चिमुकलीवर बुधवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान लैंगिक अत्याचार झाल्याची घटना जव्हार तालुक्यातील ओझर गावात घडली. या घटनेने जव्हार शहरात आदिवासी युवकांची निषेध नोंदवून सर्वत्र खळबळ उडाली आहे.


सदर आरोपी ओझर येथे बीएसएनएल कंपनीच्या टॉवरवर काम करणाऱ्या आला होता. परप्रांतीय १९ वर्षीय युवकांने सदर मुलीला मांडीवर घेऊन तिच्या सोबत लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली असुन सदर घटनेबाबत मुलींच्या पालकांनी जव्हार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून ताबडतोब जव्हार पोलीस यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधीत आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपी तिथून पळून गेल्याचे कळले.


त्यानंतर युवा आदिवासी संघ जव्हार यांच्या कार्यकर्त्यांनी रात्री याबाबत माहिती मिळताच जव्हार तालुक्यात बीएसएनएल टॉवरचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन संबंधित आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर आरोपीचे नाव इस्तियाक जुमरती अन्सारी वय वर्ष १९ असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (बी एन एस)-२०२३कलम ६४,६५,६५(२),बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४,कलम ८ नुसार गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली आहे.


सदर घटना ही अत्यंत निदनीय असून याबाबत जव्हार परिसरातील सर्व धार्मिक समाज बांधव एकत्र येऊन गुरुवारी युवा आदिवासी संघ मार्फत आदिवासी क्रांतिकारक चौक येथे सदर घटनेचा निषेध करण्यात आला असून या सदर आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तसेच परप्रांतीय आलेल्या नागरिकांची तपासणी झाली पाहिजे,महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे अश्या विविध मागण्यांबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी,तहसीलदार, पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन सदर घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात आला.यावेळी युवा आदिवासी संघाचे पदाधिकारी, सर्व आदिवासी समाज बांधव, महिला भगिनी, सरपंच संघटना पदाधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही