Marathi Natak : 'सूर्याची पिल्ले' पुन्हा अवतरणार रंगभूमीवर!

रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये रंगणार शुभारंभाचा प्रयोग


मुंबई : मराठी रंगभूमी आणि प्रेक्षकांचं एक खास नातं आहे. मनोरंजनाची कितीही माध्यमं आली तरी रंगभूमीविषयीचा जिव्हाळा प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. त्यामुळेच नाटकांच्या प्रयोगांना आजही गर्दी होताना दिसते. असंच प्रेक्षकांनी एकेकाळी डोक्यावर घेतलेलं एक नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वसंत कानेटकर लिखित 'सूर्याची पिल्ले' (Suryachi Pille) असं या नाटकाचं नाव आहे. प्रत्येक प्रयोगाला हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळवणारं हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येणार असल्याने मराठी रसिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. येत्या २२ सप्टेंबर रोजी मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊस (Royal Opera House) या ठिकाणी या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग पार पडणार आहे.


प्रसिद्ध मराठी अभिनेते सुनील बर्वे यांनी १४ वर्षांपूर्वी 'हर्बेरियम' उपक्रमांतर्गत काही अभिजात नाटकांचे २५ प्रयोग रंगभूमीवर सादर केले होते. त्यात वसंत कानेटकर लिखित 'सूर्याची पिल्ले' या नाटकाचा देखील समावेश होता. त्यावेळी प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम, त्यांची पुन्हा हे नाटक रंगमंचावर आणण्याची मागणी, या सगळ्याचाच मान राखत आम्ही 'सूर्याची पिल्ले' हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर घेऊन येत आहोत, असं सुनील बर्वे याबाबत म्हणाले.


सुबक निर्मित नवनीत प्रकाशित प्रस्तुत 'सूर्याची पिल्ले' हे तीन अंकी नाटक रंगभूमीवर येण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. या नाटकाचा शुभारंभ २२ सप्टेंबरपासून होणार आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रॉयल ऑपेरा हाऊस येथे होणार आहे. यानिमित्ताने सूर्य होऊ न शकलेल्या त्याच्या पिल्लांची पोटभर हसवणारी, मनभर सुखावणारी एक कानेटकरी क्लासिक कॉमेडी नाट्यरसिकांना परत अनुभवायला मिळणार आहे. हलक्या फुलक्या विनोदातून विचार करण्यास भाग पाडणारे असे हे नाटक आहे.



काय म्हणाले सुनील बर्वे?


खरंतर 'सूर्याची पिल्ले' हे नाटक कोरोनानंतर लगेच आणण्याचा आमचा प्रयत्न होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हे शक्य झाले नाही. परंतु आता सगळ्या गोष्टी नीट जुळून आल्याने आम्ही पुन्हा एकदा नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहोत. हे नाटक जुन्या काळातील असल्याने त्याचा ठहराव जपत, मूळ संहितेसह हे नाटक समोर येणार असल्याचे सुनील बर्वे यांनी सांगितले.



नाटकात कलाकारांची मांदियाळी


प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित या नाटकात आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, सुहास परांजपे, शर्वरी पाटणकर, उमेश जगताप, अतिषा नाईक आणि अतुल परचुरे प्रमुख भूमिकेत आहेत. अशोक पत्की यांचे संगीत लाभलेल्या या नाटकाचे सुनील बर्वे, नितीन भालचंद्र नाईक निर्माते आहेत.


Comments
Add Comment

FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेशाची शेवटची संधी? आज लागणार कॉलेज अलॉटमेंट लिस्ट; विद्यार्थ्यांनी ‘हे’ नक्की करा!

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

BMC News : महापालिकेच्या सहायक आयुक्तांमध्येच धुसफुस; व्हॉट्सअप ग्रुपवरुन बाहेर पडल्याने नाराजी उघड

- महापालिका आयुक्तांना आता याप्रकरणात लक्ष घालण्याची वेळ मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या

Water Storage Declining : महापालिका धरणांमधील पाणीसाठा घटतोय

- तब्बल ९० टक्क्यांच्या पुढे गेलेला साठा चार दिवसांत दीड टक्क्यांनी झालाय कमी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई पाणी

Global Warming : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका; मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा

- भाजप नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) भविष्यात उद्भवणाऱ्या जागतिक तापमान वाढ (ग्लोबल

Ganeshotsav 2026 ST Buses : बाप्पाच्या आगमनासाठी एसटी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरमधून धावणार शेकडो जादा बसेस; ‘या’ तारखेपासून विशेष सेवा

मुंबई : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे.

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर