Re-Released Movie : सिनेप्रेमींना मनोरंजनाची पर्वणी मिळणार; पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित होणार 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट!

एकेकाळी बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालणारे काही चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बॉलीवूडमधील (Bollywood) अनेक चित्रपट सिनेमागृहात पुन्हा प्रदर्शित (Re-Released) झाले आहेत. हम आपके है कौन, लैला मजनू, राजा बाबू, रॉकस्टार असे काही वर्षांपूर्वी गाजलेले चित्रपट चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित करण्यात आले होते. या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरघोस प्रेम दिले. त्यानंतर आता आणखी चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. जाणून घ्या कोणते आहेत ते चित्रपट.



तुंबाड - री-रिलीज होणाऱ्या चित्रपटांमधील यादीत पहिले हॉरर चित्रपट 'तुंबाड'चे नाव आहे. हा चित्रपट ६ वर्षानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ३० ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.



रहना है तेरे दिल में – आर माधवन आणि दिया मिर्झा यांचा कल्ट क्लासिक चित्रपट 'रहना है तेरे दिल में' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.



गँग्स ऑफ वासेपूर - री-रिलीजच्या यादीत अनुराग कश्यपचा कल्ट चित्रपट गँग्स ऑफ वासेपूरचाही समावेश आहे. या चित्रपटाच्या री-रिलीजची घोषणा अनुराग कश्यपने सोशल मीडियावर केली आहे.



दंगल - आमिर खानचा चित्रपट दंगल देखील या री-रिलीजच्या यादीत आहे. फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, अपारशक्ती खुराना आदींच्या भूमिका आहे. कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुलींवर चित्रपटाची कथा आहे.

Comments
Add Comment

रीलस्टार जोडपं निघाले सराईत चोर! आयफोन 17 प्रो मॅक्स, साडे सहा तोळे सोन्याचे दागिने आणि लाखो रुपये...

अहिल्यानगर: जिल्हा पोलिस दलाने बसमधून महिलांच्या पर्स चोरी करणाऱ्या एका सराईत जोडप्याला जेरबंद केले आहे. या

‘व्ही. शांताराम’ यांचे जीवन मेगा बायोपिकच्या रूपात

भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे

हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्या-फुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी

महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’!

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा हृदयस्पर्शी आणि नात्यांच्या उबदार धाग्यांनी

आमिर खान प्रोडक्शन्सची सरप्राईज भेट! वीर दासचा ‘हॅपी पटेल’ १६ जानेवारी २०२६ ला प्रेक्षकांसमोर

‘हॅपी पटेल’चा धमाकेदार खुलासा! वीर दास आणि मोना सिंगची गुप्तहेर कथा १६ जानेवारी २०२६ रोजी रिलीज आमिर खानचा नवीन

कोण करणार मराठी बिग बॉस ६ सीझनला होस्ट? सलमान खानने दिली माहिती

मुंबई : हिंदी बिग बॉस संपण्याआधीच सलमान खानने मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनला कोण होस्ट करणार याची माहिती दिली.