Monday, May 12, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

Devendra Fadanvis : पवारांसारख्या नेत्याला असे वक्तव्य करणे शोभत नाही

Devendra Fadanvis : पवारांसारख्या नेत्याला असे वक्तव्य करणे शोभत नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका


नागपूर : शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नेव्हीने तयार केला. राज्य सरकारने तयार केला नाही. हे पवार यांना माहीत आहे. भ्रष्टाचार कुठेच नको. त्याला शरद पवार काय, तर सगळ्यांचाच विरोध असला पाहिजे. मात्र, पवार यांच्यासारख्या नेत्याला निवडणुका पाहून असे वक्तव्य करणे शोभत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली.


नागपुरात बुधवारी पत्रकारांशी बोलताना फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, मालवणच्या घटनेवर कोणीच राजकारण करू नये. निश्चितपणे ही घटना कमीपणा आणणारी व दुःखद आहे. एकत्र योग्य चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. नेव्हीने गांभीर्याने घेऊन चौकशी टीम तयार केली आहे. ते पाहून गेले आहेत.


नेव्ही दोषींवर कारवाई करेल. बांधकाम विभागाने पोलिसात तक्रार केली आहे. नेव्हीच्या रिपोर्ट नंतर पोलीस कारवाई करेल. जे सिव्हिलीयन त्या टीममध्ये होते त्यांच्यावर कारवाई होईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.


विरोधकांनी या मुद्यावरून राजकारण सुरू केले आहे. निवडणुकांच्या चष्म्याने पाहायचे, असे करून राजकारण करू नये. या विषयाचे राजकारण करणे महाराष्ट्राला शोभत नाही, अशी नाराजीही फडणवीस यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment