Sunday, March 16, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar : तुम्हाला इथे काय झक मारायला ठेवले का?

Ajit Pawar : तुम्हाला इथे काय झक मारायला ठेवले का?

अजित पवारांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या कामाचे काढले वाभाडे

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे जीएसटी भवन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या कामाचे वाभाडे काढत या अधिकाऱ्यांना झाप झाप झापले. अजित पवारांना उत्तर देताना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आणि अक्षरश: ततपप झाल्याचे पाहायला मिळाले.

अजित पवारांचा पारा का चढला?

त्याचे झाले असे की, अजित पवार (Ajit Pawar) इमारत चढत होते. यावेळी पहिल्याच पायरीवर सिमेंट असल्याने अजित पवार यांच्या निदर्शनास आले. ते पाहून संतापलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना फैलावर घेतले. हे कशाला झक मारायला ठेवलंय का? हे काय मला काढायला ठेवलं आहे का? असा सवाल अजित पवारांनी यावेळी अधिकाऱ्यांना केला. यावेळी अजित पवार चांगलेच संतापल्याचा पाहायला मिळाले.

अजितदादा अधिकाऱ्यांवर का भडकले?

जीएसटी भवनची पाहणी करताना अजितदादांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. छाछूगिरी करू नका, ड्रेनेज लाईनचे काम करताना लक्षात नाही आलं का तुमच्या? असा सवाल त्यांनी केला. जीएसटी भवनाच्या नव्या इमारतीत ड्रेनेज लाईनचे झाकण वरती आल्यामुळे अजितदादा अधिकाऱ्यांवर भडकले होते.

अजित पवार आपल्या कडक स्वभावासाठी ओळखले जातात. कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल अनेकदा अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापले आहे. त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -