Mumbai Crime : मुंबईत महिला डॉक्टरला मारहाण, कोलकाताची पुनरावृत्ती करण्याची धमकी

मुंबई : मुंबईच्या मानखुर्द (Mumbai Crime) येथे पार्किंगच्या वादातून एका १६ वर्षीय तरुणाने महिला डॉक्टरला मारहाण केली आणि कोलकातातील घटनेची पुनरावृत्ती करण्याची गंभीर धमकी दिली आहे. हा प्रकार येथील साठेनगर परिसरात घडला.



नेमके प्रकरण काय?


महिला डॉक्टरने आपल्या दवाखान्याचे शटर उघडण्यासाठी समोर पार्क केलेली स्कूटी हलवली होती. काही वेळानंतर तरुणाने डॉक्टरकडे स्कूटी कोणी हलवली याची चौकशी केली. त्यावर महिला डॉक्टरने स्कूटी हलवल्याचे सांगितले. त्यावर तरुणाने डॉक्टरला शिवीगाळ केली, ज्यामुळे डॉक्टरने रागाच्या भरात त्याच्या कानशिलात लगावली.


या घटनेनंतर तरुणाने तीन महिला नातेवाईकांसोबत येऊन डॉक्टरला मारहाण केली. यावेळी तरुणाने धमकी दिली की, "कोलकात्यात काय झालं माहितीये ना, तशीच तुझीही अवस्था करेन." या धमकीने महिला डॉक्टर अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी लगेचच मानखुर्द पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.


दरम्यान, पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून, तक्रारीच्या आधारे चौकशी सुरू केली आहे. परंतु समाजात अशा घटनांचा प्रसार रोखण्यासाठी योग्य कारवाई होणे आवश्यक आहे, अन्यथा अशा धमक्या आणि हल्ल्यांमुळे समाजातील महिलांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.

Comments
Add Comment

मुंबईतील गोरेगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तोडले महिलांच्या गालांचे लचके

मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या टोळीने महिलांच्या गालांचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोरेगावमध्ये

काळा घोडा परिसराचे सुशोभीकरण, महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेला परिसर म्हणून काळा घोडा

विलेपार्ल्यात महायुतीचा जोर, उबाठा आणि काँग्रेसच्या उमेदवारांसमोर आव्हान

चित्र पालिकेचे विलेपार्ले विधानसभा  मुंबई (सचिन धानजी) : उत्तर मध्य मुंबईतील विलेपार्ले विधानसभा क्षेत्रात

मुंबई पागडीमुक्त करण्यासाठी स्वतंत्र नियमावली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची घोषणा मुंबई : मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी

पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत

लोकलच्या दारात उभे राहणे म्हणजे निष्काळजीपणा नव्हे; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : स्वप्नांची दुनिया आणि मायानगरी असलेल्या मुंबईत प्रत्येक जण आपली स्वप्न पूर्ण करायला येत असतो. आणि बघता