Shikhar Dhawan Retirement : टीम इंडियाला मोठा धक्का! 'या' क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्ती

भावूक व्हिडीओमध्ये म्हणाला...


मुंबई : इंडिया टीमचे (INDIA) दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी आंतरराष्ट्रीय टी-२०मधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी नाराजीचा सूर मारला होता. त्यानंतर आता टीम इंडियामधील आणखी एका क्रिकेटरने निवृत्ती (Retirement) घेतली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू शिखर धवनने (Shikhar Dhawan) हा निर्णय घेतला आहे. गब्बर म्हणून ओळखला जाणाऱ्या शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे सोशल मीडियावरुन जाहीर केले. त्यामुळे भारतीयांना मोठा धक्का बसला आहे.



काय म्हणाला शिखर धवन?


'मी माझ्या क्रिकेटचा हा अध्याय इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्यासोबत अनेक आठवणी सोबत घेऊन जात आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि मी घेतलेल्या निर्णयावर मला पाठिंबा दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो असं त्याने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे'.





शिखर धवनची कामगिरी


धवन हा एक उत्तम डावखुऱ्या सलामीवीरांपैकी एक होता. धवन भारतीय संघाकडून ३४ कसोटी सामने खेळला असून त्यात त्याने २३१५ धावा केल्या आहेत. ज्यात सर्वोत्तम धावसंख्या १९० इतकी आहे. यामध्ये ७ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये धवनने १६७ सामने भारताकडून खेळले असून त्यात ६७९३ धावा केल्या आहेत. यामध्ये १७ शतके आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे धवनने ६८ टी-२० सामन्यांमध्ये भारताकडून खेळताना १७५६९ धावा केल्या आङेत. यामध्ये ११ अर्धशकतांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

पंजाब किंग्सची धुरा श्रेयस अय्यरकडे?

रिकी पाँटिंगच्या अनुपस्थितीत संघ निवडण्याची जबाबदारीही येणार मुंबई  : बीसीसीआय सध्या आयपीएल २०२६ च्या मिनी

दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ‘पलटवार’

चंदिगड : मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी खेळल्या गेलेल्या

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५०