Stree 2 Box Office Collection : ‘स्त्री-२’ ने बॉक्स ऑफिसवर केली छप्परफाड कमाई, 'गदर २' ला टाकलं मागं

मुंबई: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत असलेल्या ‘स्त्री-२’ (Stree 2) चित्रपटाचे चाहते प्रतिक्षेत होते. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला स्त्री हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटानंतर स्त्री २ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर गुरुवारी (१५ ऑगस्ट) रोजी सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटगृहात प्रदर्शित होताच 'स्त्री २'ने बॉक्स ऑफिसला पछाडून सोडलेलं आहे. या चित्रपटाचं सात दिवसात बॉक्स ऑफिसवर अफलातून केलेल्या कमाईचं कलेक्शन समोर आलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी 'स्त्री २'ने छप्परफ़ाड ओपनिंग केली. चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी श्रद्धा कपूरच्या चित्रपटाने तब्बल ५१.८ कोटींचा गल्ला कमावला. यंदाच्या वर्षामधला बॉलीवूडचा सर्वाधिक ओपनिंग करणारा 'स्त्री २' दुसरा सिनेमा ठरला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनांनतर दुसऱ्या दिवशी कमाईत घट झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, वीकेंडला या चित्रपटाने पुन्हा बॉक्स ऑफिस गाजवलं. सध्या बॉक्स ऑफिसवर केवळ स्त्री २ या चित्रपटाचच बोलबाला चालू असल्याचं पाहायला मिळत आहे.



सध्या स्त्री २ (Stree 2) चित्रपटाची जादू सर्वत्र पाहायला मिळत आहे. श्रद्धा कपूर यावेळी या चित्रपटात चंदेरी गावावर आलेल्या संकटाचा अंत करण्यासाठी डायन बनून लढताना दिसत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट भलताच पसंतीस पडला आहे. स्त्री २ बॉक्स ऑफिसवर अनेक मोठ्या चित्रपटांना जबरदस्त स्पर्धा देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्त्री २ ने रिलीजच्या ८ व्या दिवशी सुमारे १६ कोटी रुपयांची अफलातून कमाई केली आहे.



स्त्री २ च्या कलेक्शनवर एक नजर


पेड प्रीव्यू ८ कोटी रुपये

१ दिवशी ५१.८ कोटी रुपये


२ दिवशी ३१.४ कोटी रुपये


३ दिवशी ४३.८५ कोटी रुपये


४ दिवशी ५५.९ कोटी रुपये


५ दिवशी ३८. १ कोटी रुपये


६ दिवशी २५.८ कोटी रुपये


७ दिवशी २० कोटी रुपये


८ दिवस १६ कोटी रुपये



आतापर्यंत एकूण कलेक्शन २९०.८५ कोटी रुपये


'स्त्री २' चे आतापर्यंतचे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Box Office Collection) पाहिल्यास चित्रपटाने भारतात २९०.८५ कोटीची धमाकेदार कमाई केली आहे. ६० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत जगभरात आपला ठसा उमटवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात 'स्त्री २' ने ४०० कोटींचा आकडा पार केला आहे.



स्त्री २ ने गदर २ ला दिली मात


१५ ऑगस्टला रिलीज झालेल्या हॉरर-कॉमेडी स्त्री २ ने पहिल्या आठवड्यात 8 दिवस बॉक्स ऑफिसवर अगदी धुमाकूळ घातली आहे. कमी बजेटमध्ये चित्रपट बनवण्यात आल्यामुळे भारतातील मोठ्या ब्लॉकबस्टरच्या यादीत स्त्री २ चा समावेश करण्यात आला आहे. तर स्त्री २ ने दुसऱ्या गुरुवारी १६ कोटी रुपयांची कमाई केली.


कमाईच्या बाबतीत स्त्री २ ने भला मोठा आकडा गाठल्यामुळे तो अफलातून कमाई केलेला आता पर्यंतचा चौथा हिंदी चित्रपट ठरला आहे. या यादीमध्ये शाहरुख खानच्या पठाण आणि जवान या चित्रपटांची नावे प्रथम आहेत. रणबीर कपूरचा ॲनिमल (Animal) चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सनी देओलच्या गदर २ (Gadar 2) चे नाव चौथ्या क्रमांकावर होते. पण आता मात्र त्याची जागा स्त्री २ या चित्रपटाने घेरली आहे. या वीकेंडला श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्त्री २५००० कोटींची कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट