Mardani 3 : ५ वर्षानंतर पुन्हा भेटणार आयपीएस शिवानी रॉय!

यशराज फिल्मसकडून 'मर्दानी ३' ची घोषणा


मुंबई : सध्या सर्व सिनेसृष्टीत नवनवीन चित्रपटांबाबत घोषणा होत आहे. अशातच १० वर्षांपूर्वी यशराज फिल्मसकडून प्रदर्शित झालेल्या 'मर्दानी' चित्रपटाबाबतही नवीन अपडेट समोर आली आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेला मर्दानी चित्रपटाला चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. त्यानंतर २०१९ मध्ये या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित झाला होता. यशराज फिल्मसची (Yash Raj Films) निर्मिती असलेल्या 'मर्दानी' चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीची (Rani Mukerji) मुख्य भूमिका साकार केली होती. चित्रपटातील तिच्या डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेने प्रेक्षकांना वेड लावले होते. हे वेड पुन्हा लावायला आयपीएस शिवानी रॉय चाहत्यांच्या भेटीस (Mardani 3) येणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 'मर्दानी'च्या पहिल्या भागाला १०वर्ष पू्र्ण झाल्याच्या निमित्ताने आज यशराज फिल्मसने टीझरच्या माध्यमातून 'मर्दानी ३' चित्रपटाची घोषणा केली. मात्र, या सिक्वेल भागाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आले नाही. मर्दानीच्या पहिल्या भागात अल्पवयीन मुलींची तस्करी, यामध्ये सहभागी असलेले राजकारणी यावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. तर, दुसऱ्या भागात स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालणारी वृत्ती, त्यांना नेहमीच पायाची धूळ समजणाऱ्या पुरुषसत्तावादी प्रवृ्त्तींवर भाष्य करण्यात आले होते. त्यानंतर आता 'मर्दानी'च्या तिसऱ्या भागात कोणता विषय हाताळला जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.


दरम्यान, या चित्रपटात आणखी कोणते कलाकार असणार, तसेच राणी मुखर्जी कोणत्या मोहिमेवर असणार याबाबत यशराज फिल्मसने कोणतेही भाष्य केले नाही.

Comments
Add Comment

Toxic Movie : रिव्ह्यू देणं पडलं महाग! 'टॉक्सिक'वर नकारात्मक बोलणाऱ्या युट्यूबरची अडचण वाढली; निर्मात्यांच्या एका निर्णयाने सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई :  कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट प्रदर्शित

Amaal Mallik : अमाल मलिकचा चित्रपट संगीताला तात्पुरता विराम; म्हणाला, ‘आता माझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार’

मुंबई : संगीतकार आणि गायक अमाल मलिकने सध्यापुरता चित्रपटांसाठी नवीन संगीत देण्यापासून दूर राहण्याचा निर्णय

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर

Shweta Tiwari : श्वेता तिवारी प्रकरणात मोठा ट्विस्ट; ट्रोलर मनसेचा सदस्य नसल्याचं उघड

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीने ऑनलाइन महिलांविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या काही सोशल

Kriti Sanon Rakhi Ad : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीचा वाद चिघळला; सोनू निगमच्या नावाने फेक पोस्ट अन् मोठा ट्विस्ट!

मुंबई : कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. GIVAच्या या

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत