Weight loss : वजन कमी करण्यासाठी उपाशी राहू नका, खा हे पदार्थ

Share

मुंबई: वाढते वजन ही आजकाल प्रचंड वाढत चाललेली समस्या आहे. अधिक वजन वाढल्याने चालण्याफिरण्यास तसेच काम करण्यास त्रास होतो. लठ्ठपणामुळे अनेक आजारही होतात. जर तुम्हीही वजन वाढीने त्रस्त आहात तर आपल्या डाएटमध्ये काही खास पदार्थांचा समावेश करू शकता ज्यामुळे वजन कमी होईल.

आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. म्हणजेच वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही तर खाऊन-पिऊनही तुम्ही वजन कमी करू शकता.

अंडी

वजन कमी करण्यासाठी अंडी फायदेशीर मानली जातात. हाय प्रोटीन आणिफॅटने भरपूर असलेली अंडी खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते.

हिरव्या भाज्या

पालक आणि हिरव्या भाज्या फायबर आणि पोषकतत्वांनी भरपूर असतात. हे खाल्ल्याने तुम्हाला हायड्रेट फील होते. हिरव्या भाज्यांमध्ये Thylakoids असते ज्याचे काम भूक संतुलित करणे असते.

मासे

माशांमध्ये हाय प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि इतर पोषकतत्वे असतात. या सर्व गोष्टी वजन संतुलित राखण्यास मदत करतात. वेट लॉससाठी तुम्ही मासे ग्रिल अथवा बेक करून खाऊ शकता. सोबतच योग्य प्रमाणात माशाचे सेवन केले पाहिजे.

नट्स

बदाम, अक्रोड या सुकामेव्यामध्ये हेल्दी अनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात. हा प्रोटीन, फायबर आणि इतर पोषकतत्वांचा चांगला स्त्रोत आहे.

कंदमुळे, बटाटा

बटाटा आणि जमिनीच्या आत असणारी कंदमुळे यांचे सेवन वजन घटवण्यात फायदेशीर ठरतात. याचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

Recent Posts

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

23 minutes ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

1 hour ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

4 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

5 hours ago