मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. येथे ती आपला पती रोहनप्रीत सिंहसोबतचे व्हिडिओ शेअर करत असते. या व्हिडिओमध्ये तसेच फोटोंमध्ये नेहासोबतच रोहनप्रीतची केमिस्ट्री पाहण्यालायक असते. यावेळेस नेहाने जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात ती आपल्या पतीसोबत रोमँटिक होताना दिसत आहे.
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह एक परफेक्ट कपलसारखे आहेत. दोघेही आपले प्रेम व्यक्त करण्यास अजिबात कचरत नाहीत. मात्र आता जो व्हिडिओ समोर आला आहे यावर युजर्सनी काही कमेंट्स केल्या आहेत.
नेहा कक्करने आपले पती रोहनप्रीत सिंहसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. ते एका क्रूझवर आहेत आणि रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. नेहा रोहनप्रीतच्या मांडीवर डोके ठेवून पहुडलेली आहे आणि रोहनप्रीत शँपेन पीत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नेहाने लिहिले, मेरा सेफ प्लेस…यासोबतच नेहाने रोहनतप्रीतला टॅगही केले आहे.
या व्हिडिओच्या कमेंट्मध्ये रोहनप्रीतने लिहिले, हमेशा तेरे नाल खडा हूं. यासोबतच त्याने हार्ट इमोजीही बनवला आहे. या व्हिडिओवर अधिक युजर्स त्यांचे कौतुक करत आहेत.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…