Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत अंशत: रद्द अर्जाची त्रुटी पूर्तता करून अर्ज पुन्हा दाखल करण्याचे आवाहन

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत दि. ०९ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मुंबई शहर जिल्हयातील ९२९४ इतके Disapproved म्हणजे अंशतः रद्द केलेले अर्ज त्रुटी पूर्तता करुन Online Resubmit करणे प्रलंबित आहेत. तरी सर्व संबधितांनी तातडीने योग्य त्या दुरुस्त्या करुन Disapproved अर्ज Resubmit करावे, जेणेकरुन त्यांची पडताळणी करुन पात्र लाभार्थीना तातडीने लाभ देणे सोईचे होईल. कोणताही पात्र लाभार्थी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन मुंबई शहर जिल्हयातील सर्व संबंधितांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.


मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारीशक्ती दूत या मोबाईल अॅपवरुन ज्यांनी स्वतःचे वा अन्य लाभार्थीचे अर्ज केले असतील अशा सर्व १. महिला २. समुह संसाधन व्यक्ती ३. बचत गट अध्यक्ष ४. बचतगट सचिव ५. गृहणी ६. अंगणवाडी सेविका/मदतनीस ७. ग्रामसेवक ८. वॉर्ड अधिकारी ९. सेतु १०. बालवाडी सेविका ११. आशा सेविका १२. पर्यवेक्षिका (मुख्यसेविका) १३. CMM2 १४. मदतकक्ष प्रमुख यांना आवाहन करण्यात येते की, नारीशक्ती दूत अॅप मधील आपल्या प्रोफाईलला लॉगीन करुन यापुर्वी केलेले अर्ज या टॅगवर क्लिक करुन आपल्याद्वारे सबमिट केलेले संपूर्ण अर्जाची यादी पाहू शकता. त्यामुळे Approved, Disapproved, Pending, Rejected असे शेरे आणि लाभार्थीचे नाव, मोबाईल नंबर सुध्दा पाहता येतील.


सर्व संबंधीतांनी Disapproved असलेल्या सर्व लाभार्थ्यांना संपर्क करुन अंशतः अर्ज रद्द होण्याचे कारण View Reason या टॅबवर बघुन त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन Edit Form टॅबवर जाऊन यापूर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करुन Form Submit करावा, यामध्ये फक्त Form एकदाच Edit करता येईल, याची नोंद घ्यावी. असे मुंबई शहरच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना जिल्हा समन्वय अधिकारी शोभा शेलार यांनी कळविले आहे.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या